केंद्रिय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि कुस्तीपटूंची बैठक बुधवारी (7 जून) पार पडली. क्रीडा मंत्री आणि कुस्तीपटूंमध्ये तब्बल पाच तास चर्चा झाली. बैठक संपल्यानंतर ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया याने माध्यमांशी संवाद साधला.
बजरंग पुनिया (Bajrang Punia) याने माहिती दिली की, “सरकारने 15 दिवसांचा वेळ मागितला आहे, सोबतच खेळाडूंवरील केस मागे घेण्याचा शब्दही दिला आहे.” बैठक संपल्यानंतर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) पत्रकार परिषदेत म्हणाले की, “कुस्तीपटूंसोबत झालेल्या चर्चेचा सार्थक झाले. खेळाडूंची इच्छा आहे की, 15 जूनपर्यंत आरोपत्र दाखल केले जावे. तोपर्यंत आंदोलन करणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.” यावेळी ठाकूर असेही म्हणाले की, 30 जूनपर्यंत भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडेल.
भारताला कुस्तीमध्ये ऑलिम्पिक कांस्य पदक मिळवून देणारी साक्षी मलिक म्हणाला, “बृजभूषणला अटक व्हावी ही आमची मुख्य मागणी आहे. आम्ही इतक्यात आंदोलन थांबवणार नाही.” कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा असणारी विनेश फोगाट या बैठकीत उपस्थित नव्हती. विनेश आधीपासून नियोजित हरियाणातील बलाली गावात बैठकीसाठी उपस्थित राहिली होती.
दरम्यान, भारतीय कुस्तीपटू आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंग (BrijBhushan Singh) यांच्यातील हा वाद मागच्या चार-पाच महिन्यांपासून सुरू आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंग यांच्यावर काही महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. 23 एप्रिल रोजी कुस्तीपटू बृजभूषणि सिंग यांच्याविरोधात दुसऱ्यांदा आंदोलनासाठी बसले होते. हे आंदोलन 28 मे रोजी दिल्ली पोलिसांकडून उलधवून टाकण्यात आले. परवानगीशिवाय कुस्तीपटू नवीन संसद भवनाकडे मोर्चा नेत असल्याने पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतले होते. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनीही कुस्तीपटूंसोबत बैठक आयोजित केली होती. (Crimes against wrestlers will be withdrawn! Big decision in meeting with sports minister)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डीआरएस घ्यावा तर ‘असा’, WTC फायनलमध्येही रोहित शर्माने दाखवला खोडसाळपणा
सचिन, व्हीव्हीएस आणि द्रविडच्या यादीत जागा बनवणार विराट कोहली! डब्ल्यूटीसी फायनलमध्ये करणार रेकॉर्ड