पोर्तुगलचा कर्णधार आणि रियल माद्रिदचा माजी खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोची जुवेंटस संघाची जर्सी पहिल्या 24 तासात नेमारच्या जर्सीपेक्षा 52 पटीने अधिक विकली गेली.
या जर्सीतून जुवेंटसने 420 कोटी रूपये कमावले आहे.
पहिल्याच दिवशी रोनाल्डोची जुवेंटसच्या 520,000 जर्सी विकल्या गेल्या. अदिदाससोबत भागीदारी असलेल्या आणि ट्यूरिनमधील या क्लबच्या 20,000 जर्सी स्टोअर्समधून तर 500,000 जर्सी ऑनलाईन विकल्या गेल्या.
तसेच 2016मध्ये जुवेंटसच्या 850,000 जर्सी विकल्या गेल्या होत्या.
https://twitter.com/juventusfcen/status/1018959185013366784
नवीन करारानुसार अदिदास या क्लबच्या खेळाडूंना खेळाचे किट पुरवणार असुन त्याच्याबदली ते खेळाडूंच्या जर्सी विकणार आहेत.
काही दिवसापूर्वी रोनाल्डोने जुवेंटस फुटबॉल क्लबसोबत चार वर्षांसाठी 846 कोटी रुपयांचा करार केला आहे. तसेच जुवेंटसने त्याला 100 मिलीयन युरो ट्रान्सफर फी दिली आहे.
We create in Black & White. @juventusfc is #HereToCreate pic.twitter.com/cGf1VsWh8k
— adidas Football (@adidasfootball) July 16, 2018
रोनाल्डो रविवारीच(15जुलै) इटलीत वैद्यकीय चाचणी आणि प्रशिक्षक मासीमिलिआनो अल्लेग्री यांची भेट घेऊन क्लबशी संबधित औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आला आहे.
रोनाल्डोला दिलेली ही ट्रान्सफर फी मागील 30 वर्षांतील सगळ्यात मोठी रक्कम आहे तर इटालीयन क्लबने खेळाडूला दिलेलीही मोठी रक्कम आहे.
यामुळे रोनाल्डो जगातील तिसरा सर्वाधिक महागडा खेळाडू बनला आहे. बार्सिलोना स्टार लियोनल मेस्सी आणि पॅरीस सेंट-जर्मन क्लबचा नेमार हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–फिफा विश्वचषक २०१८: तब्बल २५ मिलीयन सायबर हल्ले रोखण्यात रशियन सरकार यशस्वी
–फिफा विश्वचषक २०१८: अंतिम सामन्यातील कृत्य रशियन तरुणीला पडले महागात