क्रोएशिया फुटबॉल फेडरेशनने(एचएनएस) त्यांच्या संघाची जर्सी थाई गुहेतून वाचलेल्या 12 मुलांसाठी पाठवल्या.
11 ते 16 वयोगटातील शालेय मुलांचा हा फुटबॉल संघ सुमारे 18 दिवस थायलंडच्या गुहेत अडकला होता. या मुलांना मँचेस्टर युनायटेड मॅनेजर जोस मॉरिन्हो यांनी खरे नायक असे संबोधले आहे.
🇭🇷 Croatian Football Federation sends 12 national team jerseys to young footballers in @FAThailand who were saved in the recent cave rescue operation. 🇹🇭#BeProud #Croatia #Family pic.twitter.com/Xc6PadgyvF
— HNS (@HNS_CFF) July 18, 2018
या शोध मोहिमेत एलिट परदेशी डायवर्स आणि थाई नेव्हीने मोलाची भुमिका पार पाडली. तसेच या शाळेच्या फुटबॉल संघाला फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फॅटिनो यांनी थायलंड फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षांना पत्र लिहुन 15 जुलैला होणारा विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्याचे निमंत्रण दिले होते.
क्रोएशिया संघाने या 21व्या फिफा विश्वचषकात धमाकेदार प्रदर्शन केले. त्यांनी 1998च्या विश्वचषकात कांस्य त्यानंतर सुमारे 20 वर्षांनंतर रौप्य पदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली.
या स्पर्धेत क्रोएशियाचा कर्णधार आणि मिडफिल्डर लुका मोड्रिच याला गोल्डन बॉल मिळाला. त्याने या स्पर्धेतील 7 सामन्यात 2 गोल केले.
महत्त्वाच्या बातम्या-
–ब्राझिलचा हा फुटबॉलपटू ठरला जगातील महागडा गोलकिपर
–क्रोएशियाचा हा फुटबॉलपटू दुर्घटनेतून थोडक्यात वाचला