रशियात झालेल्या 21व्या फिफा विश्वचषकाचा क्रोएशिया जरी उपविजेता झाला असला तरी त्यांनी या स्पर्धेत चांगला खेळला आहे.
उपविजेता क्रोएशिया प्रथमच अंतिम सामन्यात खेळत होता. यावेळी त्यांना फ्रान्सकडून 4-2 असे पराभूत व्हावे लागले.
1998च्या विश्वचषकात कांस्य पदक जिंकून क्रोएशियाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्याच्या वीस वर्षांनंतर म्हणजेच रशियात झालेल्या 2018च्या फिफामध्ये त्यांना रौप्य पदक मिळाले.
अशा वीस वर्षांच्या फरकाने त्यांनी कांस्य पदक आणि रौप्य पदक मिळवले. त्यामुळे 2038च्या विश्वचषकात सुवर्ण पदक पटकावणार की काय, असे ट्विट क्रोएशियाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून करण्यात आले.
🇭🇷 #Croatia medals at the #WorldCup:
1998 @FIFAWorldCup: 🥉
2018 @FIFAWorldCup: 🥈
2038 @FIFAWorldCup: Seems settled, right?(Let's go for @EURO2020 and 2022 @FIFAWorldCup glory first!)#BeProud #Vatreni🔥 pic.twitter.com/0zqHjT3lTS
— HNS (@HNS_CFF) July 18, 2018
या स्पर्धेत क्रोएशियाचा कर्णधार लुका मोड्रिचला गोल्डन बॉलचा पुरस्कार मिळाला. त्याने सात सामन्यात दोन गोल केले तसेच त्याने एकूण 14 अंतरराष्ट्रीय गोल केले आहेत.
सध्या क्रोएशिया संघाचे लक्ष 2020च्या युरोपियन चॅम्पियन आणि 2022च्या फिफा विश्वचषकावर आहे. 2016च्या युरोपियन चॅम्पियन स्पर्धेत ते बाद फेरीत पोहचले होते.
तसेच 2022च्या फिफा विश्वचषकाचे कतार आणि 2026चे कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका हे यजमानपद भुषविणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
-फिफा विश्वचषक 2018: म्हणून क्रोएशियाचा डिफेंडर डेजन लोव्हरेनचा राग झाला अनावर
-उसेन बोल्ट आता गाजवणार फुटबॉलचे मैदान