मॉस्को। फिफा विश्वचषकात रविवारी(15जुलै) सामन्यात व्यत्यय आणल्याने लिव्हरपूल आणि क्रोएशियाचा डिफेंडर डेजन लोवरेन चांगलाच चिडला होता.
यामध्ये फ्रान्सने क्रोएशियाला 4-2ने पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवले आहे. तसेच या सामन्यात अनेक नाट्यमय घटना घडल्या.
यावेळी रशियातील पुसी रायोट या ग्रुपने खेळामध्ये व्यत्यय आणल्याने 52व्या मिनीटाला खेळ थांबवण्यात आला होता.
या ग्रुपमधील एक व्यक्ती लोवरेनला टाळी देण्यासाठी म्हणून आला. मात्र त्याला लोव्हरेनच्या रागाचा सामना करावा लागला.
जेव्हा तो टाळी देण्यासाठी पुढे आला त्याला लोवरेनने चिडून मैदानावर फेकले. क्रोएशियाचा या सामन्यात पराभव झाल्याने लोव्हरेन आणखीनच चिडला.
“आम्ही चांगले खेळत होतो पण ते लोक मध्येच मैदानावर आल्याने मी खूप चिडलो. मला असे वाटत होते की त्याला स्टेडियमच्या बाहेरच फेकून द्यावे”, असे लोवरेनने म्हटले.
“फ्रान्सने फुटबॉल खेळलाच नाही. त्यांच्यापेक्षा अधिक चांगला फुटबॉलचा सामना आम्ही खेळलो”, असेही त्याने पुढे म्हटले.
तर दुसरीकडे याच सामन्यात एका महिलेने फ्रान्स फॉरवर्ड कायलिन एमबाप्पे याला मैदानावर येऊन टाळी दिली.
नादाझा टोलोकोनिकोवा असे या महिलेने नाव आहे. तिच्या बरोबरच इतर तीन व्यक्तींनीही मैदानावर येऊन खेळात व्यत्यय आणला. या सगळ्यांनी पोलीसांचे बोगस युनिफॉर्म घातले होते.
या सगळ्यांना पुढील तीन वर्ष रशियातील कोणत्याही क्रीडा स्पर्धेचा सामना मैदानावर जाऊन पाहता येणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
–श्रेष्ठ कोण, मेस्सी की रोनाल्डो? ख्रिस्तियानो रोनाल्डोने दिले उत्तर
–नेमारपेक्षा रोनाल्डोच्या जर्सीची विक्री ५२ पटीने अधिक