पुणे । पावाकोलाजन पुरस्कृत टेमघर एमटीबी चॅलेंज स्पर्धेत क्रॉस कंट्री ऑलंपिक-30 किलोमीटर गटात पुण्याच्या विठ्ठल भोसलेने, तर डाऊनहिल(डीएच) हार्ड टेल गटात बंगळूरच्या शशांक सीके यांनी अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
बॅकपॅक आउटडोर, रोलिंग अकादमी आणि मुंबई एमटीबी ऑफरोडर्स यांच्या तर्फे आयोजित टेमघर एमटीबी चॅलेंज स्पर्धेत पुणे, मुंबई, बंगळुरू, नाशिक आणि इंदोर या ठिकाणांहून 45 सायकलपटूंनी आपला सहभाग नोंदविला होता. क्रॉस कंट्री ऑलंपिक-30 किलोमीटर, क्रॉस कंट्री सर्किट- 8 किलोमीटर, डाऊनहिल(डीएच) फुल सस्पेन्शन व डाऊनहिल(डीएच) हार्ड टेल या 4 प्रकारात ही स्पर्धा पुणे येथील कॅम्प हाईडआउट, टेमघर बॅकवॉटर येथे पार पडली.
स्पर्धेत क्रॉस कंट्री ऑलंपिक-30 किलोमीटर गटात पुण्याच्या विठ्ठल भोसले याने 1 तास 25मिनिटे वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. तर, मुंबईच्या ईशान शर्मा व शुभम सिंग यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकवला. डाऊनहिल(डीएच) फुल सस्पेन्शन गटात पुण्याच्या स्लेद गोम्सने 1 मिनिट 02.37सेकंद वेळ नोंदवून अव्वल क्रमांक पटकावला. डाऊनहिल(डीएच) हार्ड टेल प्रकारात बंगळुरूच्या शशांक सीके याने 1मिनिट 08.39सेकंद वेळ नोंदवून विजेतेपद मिळवले.
याशिवाय स्पर्धेत 2 महिला स्पर्धकांसह 4मास्टर्स(40 वर्षावरील)वयोगटातील स्पर्धकांनीदेखील आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये डाऊनहिल(डीएच) फुल सस्पेन्शनमध्ये बेंगळूरच्या अनिसा लमारेने, तर क्रॉस कंट्री सर्किट- 8 किलोमीटरमध्ये मुंबईच्या मनाली अबनावे यांनी तर , मास्टर्स प्रकारात विक्रम बराटे, बिट्टू सिंग, लैश्राम सिंग आणि रुपेश सिंग यांनी हि शर्यत यशस्वीरीत्या पूर्ण केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
क्रॉस कंट्री ऑलंपिक-30 किलोमीटर: 1. विठ्ठल भोसले(पुणे) 1 तास 25मिनिटे, 2. ईशान शर्मा(मुंबई) 1 तास 31मिनिटे, 3. शुभम सिंग(मुंबई) 1 तास 40मिनिटे;
क्रॉस कंट्री सर्किट- 8 किलोमीटर: 1. विठ्ठल भोसले(पुणे) 20मिनिटे 20 सेकंद, 2. ईशान शर्मा(मुंबई) 21 मिनिटे 05सेकंद, 3. शुभम सिंग(मुंबई) 21 मिनिटे 38 सेकंद;
डाऊनहिल(डीएच) फुल सस्पेन्शन: 1. स्लेद गोम्स(पुणे) 1 मिनिट 02.37सेकंद, 2. रिषभ गौडा(बंगळुरू) 1मिनिट 04.32सेकंद, 3. अभिजित घरड(पुणे) 1मिनिट 05.90सेकंद;
डाऊनहिल(डीएच) हार्ड टेल: 1. शशांक सीके(बंगळुरू) 1मिनिट 08.39सेकंद, 2.श्रीविशाल बलिपती(पुणे) 1मिनिट 11.40सेकंद, 3. साहिल सेहगल(पुणे) 1मिनिट 14.79 सेकंद.