इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (8 एप्रिल) दुसरा सामना वाजता वानखेडे स्टेडिअम येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईसाठी पदार्पण करत असलेल्या अजिंक्य रहाणे याने अंतर्गत क्रिकेटमधील आपल्या घरच्या मैदानावर खेळताना अक्षरशः वादळ आणले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत त्याने यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केले.
FIFTY 🆙 for @ajinkyarahane88 💛
He's looking in ultimate touch here in Mumbai 👌👌@ChennaiIPL finish the powerplay with 68/1 after 6 overs!
Follow the match ▶️ https://t.co/rSxD0lf5zJ#TATAIPL | #MIvCSK pic.twitter.com/fgI9yaLrWz
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2023
विजयासाठी मिळालेल्या 158 धावांचा पाठलाग करताना चेन्नईला चांगली सुरुवात लाभली नाही. डेवॉन कॉनवे पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतर रहाणे फलंदाजासाठी उतरला. त्याने सुरुवातीला अर्शद खानवर आक्रमण केले. त्याच्या एकाच षटकात एक षटकार व चार चौकार वसूल करत त्याने दमदार सुरुवात केली. त्यानंतरही त्याचे आक्रमण थांबले नाही. त्याने सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे कोणत्याही खेळाडूकडून झळकावलेले हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी धावसंख्या उभारली नाही. ईशान किशन व रोहित शर्मा यांनी संघाला 38 धावांची सलामी दिलेली. मात्र, त्यानंतर रवींद्र जडेजा व मिचेल सॅंटनर यांनी मुंबईची वाहतात केली. अखेर टीम डेव्हिडने थोडाफार प्रतिकार केल्याने मुंबईला 157 पर्यंत मजल मारता आली.
(CSK Ajinkya Rahane Smash Fastest Fifty In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई वि. चेन्नई : धोनीने पहिली बाजी जिंकली, नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग इलेव्हन
रत्नागिरी अरावली ॲरोज संघाने रोखला परभणी संघाचा विजयीरथ