भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये मागील दहा वर्षापासून चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करतोय. मागील वर्षी त्याने संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, त्याचवेळी जडेजा व संघ व्यवस्थापन यांच्यात वाद झाल्याची बातमी समोर आलेली. त्यानंतर आता जडेजा चेन्नईपासून वेगळा होणार असल्याचे नवे संकेत मिळू लागले आहेत.
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचे गेल्या तीन वर्षांत दोन हंगाम खराब गेले आहेत. २०२० मध्ये चेन्नईचा संघ प्रथमच प्लेऑफमध्ये पोहोचला नव्हता. त्यानंतर साखळी फेरीतच त्याचा प्रवास संपला. यानंतर, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली, संघाने २०२१ मध्ये जोरदार पुनरागमन केले आणि विजेतेपद पटकावले.
आयपीएल २०२२ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी अष्टपैलू रवींद्र जडेजाला चेन्नईचा कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, संघाची कामगिरी खूपच खराब होती. जडेजाने हंगामाच्या मध्यात कर्णधारपद सोडले आणि धोनीला पुन्हा कर्णधार बनवण्यात आले. नेमके त्याचवेळी जडेजा दुखापतग्रस्त होऊन हंगामातून बाहेर झाला. चेन्नई संघ व जडेजा यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा त्यावेळी सुरू झाली होती. मात्र, संघ व्यवस्थापनाकडून या बातम्यांचे खंडन केले गेलेले.
नव्याने येत असलेल्या बातम्यानुसार, आयपीएल २०२२ पासून जडेजा व सीएसके व्यवस्थापन यांच्यात कोणतेही संभाषण झालेले नाही. त्यामुळे सीएसके व जडेजा यांच्यातील नाते आता अगदी तुटण्याच्या नजीक असल्याचे सांगितले जातेय. याबाबतची अधिकृत घोषणाही लवकर होण्याची शक्यता आहे. असे झाल्यानंतर जडेजा १० वर्षानंतर आयपीएल लिलावात उतरताना दिसेल.
आयपीएल २०२२ मध्ये चेन्नईला १४ पैकी फक्त चार सामने जिंकता आले होते. जडेजाने गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियावर असे काही केले होते, ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले गेले. त्याने इन्स्टाग्रामवरून सीएसकेसंबंधित सर्व पोस्ट हटवल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-






