आयपीएलचा ११ वा मोसम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वच संघांची तयारी सुरु झाली आहे. अनेक संघ सराव सामने खेळत आहेत. अशाच चेन्नई सुपर किंग्स संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या एका सराव सामन्यासाठी तब्बल १० हजार प्रेक्षक उपस्थित होते.
हे सराव सत्र चेन्नईमधील चेपॉक स्टेडियमवर घेण्यात आले होते. याबद्दल यष्टीरक्षक फलंदाज सॅम बिलिंग्सने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे. यात त्याने त्याचा एक फोटो शेयर केला आहे. तसेच या फोटोत प्रेक्षकांची उपस्थिती स्पष्ट दिसून येत आहे. यात बिलिंग्सने म्हटले आहे की फक्त एका सध्या सराव सामन्यासाठी १० हजार प्रेक्षकांची उपस्थिती ही आश्चर्यकारक आहे.
https://www.instagram.com/p/BhDuhZ3gEYi/?taken-by=sambillings
चेन्नई हा आयपीएलमधील दांडगा चाहता वर्ग असणारा संघ आहे. याबरोबरच चेन्नई संघाच्या ट्विटरवरूनही बिलिंग्सचा एक व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. ज्यात बिलिंग्स म्हणाला, “नमस्कार चेन्नई. या संघात असणे खूप छान आहे. आजच्या सराव सामन्यात आम्ही दोन डाव खेळलो. यासाठी आम्हाला चांगला पाठिंबा मिळाला.”
पुढे बिलिंग्स म्हणाला, “फक्त सराव सामन्यासाठी १० हजार प्रेक्षकांची उपस्थिती. हे खूप मस्त वातावरण आहे. मी आता आयपीएल सुरु होण्याची वाट पाहत आहे. चेन्नई खूप चांगली फ्रँचायझी आहे.”
Semma @sambillings about his first practice session/match, the fans at Chepauk and #BrotherMark.@MAWood33 Are you listening? #WhistlePodu🦁💛 pic.twitter.com/gNgWXlVZ44
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 1, 2018
आयपीएलमध्ये सर्वाधिक चाहता वर्ग असणाऱ्यांपैकी चेन्नई सुपर किंग्स हा एक संघ आहे. तसेच चेन्नई संघाची आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांमध्ये गणती होते. चेन्नईने आत्तापर्यंत २०१० आणि २०११ असे दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. तसेच त्यांनी २००८ ते २०१५ पर्यंत ६ वेळा अंतिम फेरी गाठली आहे.
मात्र मागील दोन वर्ष चेन्नई सुपर किंग्स संघावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे या दोन वर्षानंतर चेन्नईचा संघ यावर्षी आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. चेन्नईने एमएस धोनीला कर्णधारपदावर कायम ठेवले आहे.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात ७ एप्रिलला आयपीएलच्या सलामीचा सामना रंगणार आहे.