2025च्या आयपीएल हंगामाची चाहत्यांना आतुरता लागली आहे. पण या हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. अनेक मोठ्या खेळाडूचे संघ बदलताना दिसणार आहेत. त्यामुळे मेगा लिलाव देखील रोमांचक पाहायला मिळणार आहे. सर्व संघ त्यांनी सोडलेल्या आणि संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करणार आहेत. तत्पूर्वी चाहत्यांची नजर चेन्नई सुपर किंग्ज संघावर असेल. कारण संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालं नाही, तर सीएसकेला आपल्या चमकदार कामगिरी करणाऱ्या 3 खेळाडूंना संघातून सोडावं लागू शकतं.
मुस्तफिजूर रहमान- बांगलादेशचा हा वेगवान गोलंदाज शेवटच्या हंगामात सीएसके संघाचा भाग होता. त्यानं शेवटच्या हंगामात सीएसकेसाठी चमकदार कामगिरी केली होती. त्यानं सीएएसकेसाठी 9 सामने खेळले होते. त्यामध्ये त्यानं धमाकेदार गोलंदाजी करत 14 विकेट्स त्चाच्या नावावर केल्या होत्या. पण सीएससके त्याला आगामी हंगामापूर्वी इच्छा नसताना देखील सोडू शकतं.
दीपक चाहर- दीपक चाहर अनेक हंगामापासून सीएसकेसाठी शानदार गालंदाजी करत आला आहे. त्याच्या गोलंदाजीच्या चमकदार कामगिरीवर सीएसकेनं अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पण शेवटच्या हंगामात तो सीएएसकेसाठी चमकदार कामगिरी करु शकला नाही. तो दुखापतीनंतर संघात परतला होता. शेवटच्या हंगामात त्यानं 8 सामने खेळले आणि केवळ 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे आगामी हंगामापूर्वी सीएसके त्याला सोडू शकतं.
मिचेल सेंटनर- न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू मिचेल सेंटनर शेवटच्या हंगामात सीएसकेसाठी खास कामगिरी करु शकला नाही. तो फलंदाजी करताना देखील अयशस्वी राहिला. शेवटच्या हंगामात त्याला 3 सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली होती. त्यामध्ये त्यानं केवळ 64 धावा केल्या. तर गोलंदाजीमध्ये त्यानं 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आगामी हंगामात त्याला सीएएसके त्याला सोडू शकतं.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेटपासून हार्दिक खूपच लांब! दुलीप ट्राॅफीमध्येही नाही खेळणार
मोठी अपडेट: सीएएसने फेटाळली विनेश फोगटची मागणी! नाही मिळणार रौप्य पदक
भारताचा स्टार फिरकीपटू ‘या’ लीगमध्ये घालतोय धुमाकूळ…!