---Advertisement---

‘माही’ची खिलाडूवृत्ती! पराभवानं निराश झालेल्या मॉर्गनला धोनीनं दिलं प्रोत्साहन, पाहा व्हिडिओ

On: शनिवार, ऑक्टोबर 16, 2021 6:09 PM
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुबई येथे झालेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या अंतिम सामन्यात सीएसकेने केकेआरचा २७ धावांनी पराभव करत आयपीएलचे जेतेपद पटकावले. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचे हे चौथे आयपीएल जेतेपद आहे.

आयपीएल २०२१ चे विजेतेपद जिंकल्यानंतर धोनीने पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली आहेत. सामना जिंकल्यानंतर धोनीने निराश झालेल्या ओएन मॉर्गनशी बराच काळ हात धरून त्याला प्रोत्साहन दिले. यादरम्यान धोनी ओएन मॉर्गनला सतत काहीतरी सांगताना दिसला. सामना आणि जेतेपद गमावल्यानंतर ओएन मॉर्गन खूप निराश झाला होता, पण धोनीच्या शब्दांनी त्याच्या चेहऱ्यावर हलके स्मित हास्य आणले.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने तीन गडी गमावून १९२ धावा केल्या होत्या. फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ८६ धावा केल्या तर त्याचा साथीदार ऋतुराज गायकवाडनेही ३२ धावा केल्या. याशिवाय रॉबिन उथप्पाने ३१ आणि मोईन अलीने नाबाद ३७ धावांचे योगदान दिले. केकेआरकडून सुनील नरेनने दोन आणि शिवम मावीने एक विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल केकेआरचा संघ निर्धारित २० षटकांत ९ गडी बाद १६५ धावाच करू शकला. यापूर्वी २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये सीएसकेने धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. त्याचबरोबर कोलकाताने २०१२ आणि २०१४ मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

यंदाच्या हंगामात सीएसकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅप जिंकण्यात यशस्वी झाला. गायकवाड यावर्षी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. सामना संपल्यानंतर गायकवाड म्हणाला की, संघ विजयी बनल्याने त्याच्या कर्तृत्वाचे महत्त्व वाढले आहे. हा आयपीएल चषक जिंकल्याने ऑरेंज कॅपला महत्त्व प्राप्त झाले आहे. ही भावना शब्दात मांडणे कठीण आहे, परंतु गेल्या वर्षीच्या हंगामानंतर येथे जिंकणे ही एक मोठी गोष्ट आहे.

गायकवाडने स्पर्धेत ६३५ धावा केल्या, तर सहकारी सलामीवीर फाफ डू प्लेसिस ६३३ धावांसह दुसऱ्या स्थानावर राहिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

सोने पे सुहागा! आधी जेतेपदाचा जल्लोष अन् नंतर शार्दूल ठाकूरच्या बर्थडेचं सेलिब्रेशन, व्हिडिओ व्हायरल

प्रतिस्पर्धी असूनही ‘त्या’ प्रसंगानंतर धोनीने त्रिपाठीची थोपटली पाठ, कारण ऐकून छाती अभिमानाने फुगेल

आपल्या षटकारांनी प्रेक्षकांना नेहमीच आभाळाकडे पाहायला लावणारे ५ धुरंधर; अव्वलस्थानी ‘हा’ पठ्ठ्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---