जगभरातील सर्वात मोठी टी20 लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगचा 16वा हंगाम दिमाखात पार पडत आहे. आयपीएल 2023 स्पर्धेत ‘कसोटीतज्ञ’ अजिंक्य रहाणे हा शानदार फॉर्ममध्ये आहे. महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघासाठी रहाणे खणखणीत चौकार-षटकारांचा पाऊस पाडत वाहवा लुटत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये 190च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. यापूर्वी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही दमदार खेळाचे दर्शन घडवले होते. या सर्वांचे बक्षीस म्हणून जूनमध्ये पार पडणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यासाठी त्याची भारतीय संघात जागा पक्की झाली आहे. हा सामना इंग्लंडच्या के ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. मात्र, अशातच रहाणेबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय संघ डब्ल्यूटीसी (WTC) स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी एक सराव सामनाही खेळू शकतो. ज्यांचा संघ आयपीएल 2023च्या प्ले-ऑफमध्ये पोहोचला नाही, ते खेळाडू 23मे रोजी इंग्लंडसाठी रवाना होतील. आता असेही वृत्त समोर येत आहे की, अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या भारतीय संघातील निवडीमागे एमएस धोनी (MS Dhoni) याची मोठी भूमिका आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, बीसीसीआयने रहाणेबाबत चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार एमएस धोनी याच्याकडून माहिती घेतली. संघातील रहाणेच्या निवडीबाबत त्याचे मत जाणून घेतले. संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने रहाणेच्या निवडीवर यापूर्वीही धोनीसोबत चर्चा केली होती.
रहाणे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात (World Test Championship 2023 Final) भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. विशेषत: मधल्या फळीत तो भारतीय संघाला आधार देऊ शकतो. श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांसारख्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत रहाणेची भूमिका खूपच महत्त्वाची मानली जात आहे.
आयपीएल 2023मध्ये रहाणेची कामगिरी
अजिंक्य रहाणे याला चेन्नई सुपर किंग्स संघाने 2023च्या लिलावात 50 लाख रुपयांच्या मूळ किंमतीत संघात सामील केले होते. त्याला सुरुवातीच्या सामन्यात संधी देण्यात आली नाही. मात्र, त्यानंतर रहाणेला तिसऱ्या क्रमांकावर खेळवले. त्यानंतर त्याने शानदार कामगिरी केली आहे. त्याने 6 सामन्यात 44.80च्या सरासरीने 224 धावांचा पाऊस पाडला आहे. (csk captain ms dhoni is behind ajinkya rahane selection in indian team reports)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राजस्थानच्या घौडदौडीतील ‘ध्रुव’ तारा! फिनिशर म्हणून जुरेल पाडतोय भल्याभल्यांचा कंडका
मुंबई सोडा सीएसकेला राजस्थानच नडतेय! आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल खरयं