---Advertisement---

मोठी बातमी! धोनी आयपीएल फायनलमधून बाहेर? गुजरातविरुद्ध केलेली चतुराई अंगलट

On: गुरूवार, मे 25, 2023 1:23 PM
csk-ms
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघ आमने-सामने होते. चेन्नईने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत या सामन्यात विजय मिळवला. यासोबतच अंतिम फेरीतील त्यांची जागा नक्की झाली. मात्र, चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी हा या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. 

चेन्नई धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला असला तरी, आता संघाचा कर्णधार एमएस धोनी याला या सामन्य दरम्यान केलेली एक चतुराई महागात पडू शकते. धोनीने या सामन्यात मथिशा पथिराना याला गोलंदाजी देण्यासाठी तब्बल पाच मिनिटे वेळ खर्च केला होता.

पथिराना विश्रांती घेतल्यानंतर डावातील सोळावे षटक टाकण्यासाठी आलेला. मात्र, नियमानुसार मैदानावर नऊ मिनिटे वेळ घालवल्याशिवाय त्याला गोलंदाजी करता येणार नव्हती. त्याआधी तो मैदानावर आल्याचे केवळ चार मिनिटे झाली होती. हा कालावधी पूर्ण करण्यासाठी धोनी व चेन्नईच्या खेळाडूंनी तब्बल पाच मिनिटे पंचांशी चर्चा केली. या काळात नऊ मिनिटांचा वेळ पूर्ण झाला व पथिराना गोलंदाजी करू शकला.

त्याचवेळी या सामन्यात चेन्नई संघ निर्धारित वेळेपेक्षा संथ गतीने षटके टाकताना दिसला. नियमानुसार कोणत्याही कर्णधाराने दोन वेळा अशी चूक केल्यास त्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात येते. धोनीवर यापूर्वी हंगामात अशी वेळ आली नव्हती.

मात्र, पथिरानाला गोलंदाजी देण्यासाठी वेळ दवडल्यामुळे पंचांनी सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असेल तर, धोनीवर कारवाई केली जाऊ शकते. अशात त्याच्यावर एका सामन्याची म्हणजेच अंतिम सामन्याची बंदी लादली जाईल.

(CSK Captain MS Dhoni May Get Banned From IPL 2023 Final Due To Slow Over Rate)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सुट्टी नाही! लखनऊ पराभूत होताच मुंबईच्या खेळाडूंनी उडवली नवीनची खिल्ली, सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---