चेन्नई सुपर किंग्स संघाने मंगळवारी (दि. 30 मे) आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाला पराभवाचा धोबीपछाड दिला. चेन्नईने डकवर्थ लुईस नियमानुसार 5 विकेट्सने सामना जिंकला. या सामन्यानंतर सीएसके कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्या आयपीएल भविष्यावर सीईओ काशी विश्वनाथन यांनी बुधवारी (दि. 31 मे) मौन सोडले. धोनी आयपीएलच्या 17व्या हंगामात सीएसकेचे नेतृत्व करणार की नाही, याबाबत विश्वनाथन यांनी खुलासा केला. तसेच, त्याच्या दुखापतीविषयी म्हटले की, तो डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर निर्णय घेईल.
सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन (CSK CEO Kasi Viswanathan) यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “होय, हे खरंय की, धोनी डाव्या गुडघ्याच्या दुखापतीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेईल आणि त्यांच्यानुसारच निर्णय घेईल. जर सर्जरीचा सल्ला दिला गेला, तर रिपोर्ट आल्यानंतरच कळेल. हा पूर्णपणे त्याचा निर्णय असेल.” एमएस धोनी (MS Dhoni) याने अंतिम सामना जिंकल्यानंतर म्हटले होते की, तो चाहत्यांसाठी आणखी एक हंगाम खेळू शकतो, पण हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल.
धोनी स्वत: घेणार निर्णय
पुढील हंगामात सीएसकेसाठी खेळण्याचा पर्याय धोनी निवडू शकतो का, जो लिलावातील चेन्नईचे मानधनही वाढवू शकतो असा प्रश्न काशी विश्वनाथन (Kasi Viswanathan) यांना करण्यात आला. विश्वनाथन यांनी स्पष्ट केले की, फ्रँचायझीसोबत आपल्या भविष्याबाबत निर्णय घेणे, हे भारतीय माजी कर्णधारावर अवलंबून आहे. ते म्हणाले की, “खरं सांगायचं झालं, तर मी विचारही करत नाहीये. कारण, आम्ही सर्वजण तिथपर्यं पोहोचलो नाहीत. हा पूर्णपणे धोनीचा निर्णय असेल. मात्र, मी तुम्हाला सांगू शकतो की, आम्ही त्याविषयी विचार केला नाहीये.”
धोनीच्या डाव्या गुडघ्यावर ताण
एमएस धोनी त्याच्या डाव्या पायाच्या गुडघ्याच्या दुखापतीसह आयपीएल सामने खेळत होता. असे म्हटले जात होते की, धोनी सर्जरी करू शकतो. धोनी डाव्या गुडघ्यामध्ये ताण आल्यामुळे चिंतेतही दिसत होता. असे असूनही तो चाहत्यांसाठी खेळत होता. आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेचा अंतिम सामन्यात गुजरातला पराभूत केल्यानंतर धोनीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. धोनीने चेन्नईला पाचव्यांदा ट्रॉफी जिंकून देण्याचा पराक्रम गाजवला. आता तो पुढील हंगामात खेळतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (csk ceo breaks silence on skipper ms dhoni knee injury after ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: ज्यांच्यामुळे IPL Final होऊ शकली, त्यांना कसा विसरेल धोनी; ट्रॉफी उंचावल्यानंतर केलं ‘हे’ काम
पती शेर, तर पत्नी सव्वाशेर! पाहा भारतीय क्रिकेटर्स अन् क्रीडाक्षेत्रात नाव कमावणाऱ्या त्यांच्या सुंदर बायका






