इंडियन प्रीमियर लीग 2022 नंतर आयपीएलप्रेमींना आगामी हंगामाची आतुरता आहे. दरम्यान रविवारी (04 सप्टेंबर) आयपीएलमधून एक मोठी बातमी पुढे येत आहे. आयपीएलमधील दुसरा सर्वात यशस्वी संघ, चेन्नई सुपर किंग्ज संघाने दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनी याला आगामी हंगामासाठी कर्णधारपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे. चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
CSK CEO confirms MS Dhoni will captain CSK in IPL 2023.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 4, 2022
मागील हंगामात चेन्नई संघाने आपला सर्वात अनुभवी अष्टपैलू रविंद्र जडेजा याला नेतृत्त्वपदी नियुक्त केले होते. परंतु तो ही जबाबदारी योग्यरीत्या पेलू न शकल्याने अर्ध्या हंगामातून त्याचा या पदावरून पायउतार करण्यात आला होता आणि पुन्हा धोनीकडे नेतृत्त्वपद सोपवले गेले होते. धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईने 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेच्या खेळाडूवर चढला राशिदचा पारा, भर मैदानात अंगावर धावला; वादाचा प्रसंग कॅमेरात कैद
लिजेंड्स लीगचे संघ जाहीर! सेहवाग-इरफानचे संघ मजबूत; तर भज्जी-गौतीच्या वाट्याला हे दिग्गज
चिपलकट्टी स्मृती आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन ग्रांप्री: बिगरमानांकित दर्शन पुजारी अंतिम फेरीत