भारतात सध्या इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. येत्या ९ एप्रिलपासून आयपीएल २०२१ हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघ नव्या उत्साहाने मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. त्यांनी मागील काही दिवसांपासूनच सरावाला सुरुवात केली आहे. या सराव सत्रांमधील अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहे. आता चेन्नई संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचाही व्हिडिओ व्हायरल होत आहे.
फ्लेमिंग यांच्या वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेशन
न्यूझीलंडचे माजी कर्णधार आणि सध्याचे चेन्नईचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांचा १ एप्रिलला वाढदिवस होता. ते सध्या आयपीएलच्या तयारीसाठी चेन्नई सुपर किंग्स संघासह मुंबईत आहेत. या दरम्यान फ्लेमिंग यांचा वाढदिवस चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडू आणि इतर सदस्यांनी मिळून जोरदार साजरा केला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ देखील चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की फ्लेमिंग त्यांच्या वाढदिवसाचा केक कापत आहेत. त्यांच्या शेजारी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी उभा आहे. तसेच त्यांनी केक कापून झाल्यानंतर चेन्नईच्या खेळाडूंनी त्यांना केक भरवला आणि त्यांच्या तोंडालाही केक लावला. त्यानंतर फ्लेमिंग यांनी सुरेश रैनाला मिठी मारत त्यांच्या चेहऱ्याला लागलेला केक त्यालाही लावला. तसेच या व्हिडिओमध्ये चेन्नई संघातील सदस्य मजा-मस्ती करतानाही दिसत आहेत.
Bonds beyond boundaries!
Siripu Enipu and a lot of #Yellove to you Coach @SPFleming7 . #WhistlePodu #SavourTheMoment pic.twitter.com/lUaYp0M2kH— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 2, 2021
चेन्नईची आयपीएल २०२१ ची सुरुवात मुंबईतून
खरंतर यंदा कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे आयपीएलचे आयोजन वेगळ्या प्रकारे करण्यात आले आहे. ज्यामध्ये प्रत्येक संघ साखळी फेरीदरम्यान केवळ ३ वेळा प्रवास करणार आहे, ज्यामुळे कोरोना व्हायरसचा धोका कमी होईल. तसेच कोणताही संघ आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही.
त्यामुळे यंदा चेन्नई संघाचे पहिले ५ सामने मुंबईत होणार आहेत. त्यानंतर चेन्नई साखळी फेरीतील पुढील सामने दिल्ली, बंगळुरु आणि कोलकाता येथे खेळणार आहे. चेन्नईचा पहिला सामना १० एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे.
आयपीएल २०२१ साठी चेन्नई सुपर किंग्सचा संघ –
एमएस धोनी (कर्णधार) , फाफ डू प्लेसीस, ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, अंबाती रायडू, एन जगदीशन, रॉबिन उथप्पा, रविंद्र जडेजा, सॅम करन, ड्वेन ब्रावो, कर्ण शर्मा, आर साई किशोर, मिचेल सँटनर, इम्रान ताहिर, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, लुंगी एन्गिडी, केएम आसिफ, मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, हरी निशांत.
महत्त्वाच्या बातम्या –
महाकठीण! आयपीएलमधील धोनी-कोहलीने केलेले ‘हे’ विक्रम रोहितलाही मोडणे आहे केवळ अशक्य
मानलं तुम्हाला! आयपीएलमध्ये एकही शतक न करता ‘या’ तीन दिग्गजांनी ठोकल्यात चार हजार धावा
आयपीएलमध्ये षटकार म्हटलं की रोहित-विराट नाही, तर ‘हे’ तीघे फलंदाज आहेत सर्वात पुढे