चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तर नुकताच आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्स संघाने जेतेपदाचा चौकार मारला आहे. या विजयानंतर एन श्रीनिवासन भलतेच खुश झाले आहेत. यासह त्यांनी एमएस धोनीचे तोंडभरून कौतुक केले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या मालकीची कंपनी इंडिया सिमेंट्सचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एन श्रीनिवासन यांनी सोमवारी (१८ ऑक्टोबर) मोठे वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, “धोनी शिवाय चेन्नई सुपर किंग्स संघाची कल्पना केली जाऊ शकत नाही.” तर बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांनी असेही म्हटले की, “चेन्नई सुपर किंग्स संघाशिवाय धोनीची कल्पना केली जाऊ शकत नाही.”
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभूत करून जेतेपद पटकावले होते. त्यानंतर श्रीनिवासन यांनी आयपीएल ट्रॉफीसह भगवान वेंकटाचलापतीचे दर्शन घेतले. दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटले की, “धोनी, सीएसके आणि तामिळनाडूचा महत्वाचा भाग आहे. धोनी शिवाय सीएसके नाहीये आणि सीएसके शिवाय धोनी नाहीये.”
अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाचा विजय
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर चेन्नई सुपर किंग्स संघाकडून फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ८६ तर ऋतुराज गायकवाडने ३२ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्स संघाला २० षटक अखेर १९२ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून शुबमन गिलने ५१ तर व्यंकटेश अय्यरने ५० धावांची खेळी केली. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने २७ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
धू धू धुतला…! ४, ४, ४, ४, ४ पाकिस्तानी गोलंदाजावर अक्षरश: तुटून पडला कायरन पोलार्ड, पाहा व्हिडिओ
‘हो तो घाबरतोय’, फलंदाजी करत असलेल्या गेलची पाकिस्तानी गोलंदाज अन् यष्टीरक्षकाने उडवली खिल्ली
टी२० विश्वचषकातील गेलचा ‘हा’ विक्रम मोडणे अशक्य, विस्फोटक फलंदाज रोहित-ब्रावोलाही नाही जमणार