इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये ४ वेळा ट्राॅफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाला (सीएसके) लखनऊ सुपर जायंट्स संघाने गुरुवारी(३१ मार्च) आयपीएल २०२२ हंगामाच्या ७ व्या सामन्यात ब्रेबोर्न स्टेडियममध्ये ६ विकेट्सने पराभूत केले. सीएसकेचा हा दूसरा सामना असून संघाला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध सुद्धा अपयश आले होते. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सीएसकेला हंगामातील पहिल्या दोनही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता कर्णधार रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) या अपयशाचे कारण सांगितले आहे.
लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सीएसकेने (CSK) राॅबिन उथप्पाच्या ५० धावा आणि शिवम दूबेच्या ४९ धावांच्या मदतीने संघाने २० षटकांत ७ विकेट्स गमावत २१० धावा केल्या. हे लक्ष्य लखनऊचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डि काॅकच्या ६१ आणि इविन लुईसच्या ५५ धावांच्या मदतीने १९.३ षटकातच गाठले. चेन्नईचा कर्णधार रविंद्र जडेजाने या सामन्यानंतर सांगितले की, त्यांना खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसला. सीएसकेने लखनऊचा कर्णधार केएल राहुल आणि डी काॅकचे झेल सोडले. या दोघांनी ९९ धावांची भागीदारी केली.
सीएसकेचा कर्णधार सामन्यानंतर म्हणाला, “आमची सुरुवात खूप चांगली झाली. परंतु, सामना जिंकण्यासाठी तुम्हाला चांगले क्षेत्ररक्षण करत झेल घ्यायला हवेत. आम्ही त्या संधींचा फायदा घेऊ शकलो असतो. आज खूप दवसुद्धा होते आणि चेंडूसुद्धा हातात येत नव्हता. आम्हाला ओल्या चेंडूने सराव करावा लागेल.”
फलंदाजांचे कौतुक करताना तो म्हणाला, ‘प्रथम ६ फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी केली, विकेट फलंदाजीसाठी चांगली होती. गोलंदाजी युनिट म्हणून आम्हाला योजनेची आंमलबजावणी करावी लागेल.’ लखनऊला शेवटच्या षटकांमध्ये विजयासाठी ३४ धावांची गरज होती. शेवटच्या षटकात शिवम दूबेला जडेजाला गोलंदाजी करण्याची संधी दिली. त्याच्या य़ा षटकात २५ धावा झाल्या आणि हा सामना लखनऊच्या नावे झाला. लखनऊला पहिल्या सामन्यात गुजरातविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
महास्पोर्टसचा वाॅट्सअॅप ग्रुप जाॅईन करण्यासाठी या लिंकवर क्लीक करा.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022: केव्हा आणि कसा पाहाल कोलकाता वि. पंजाब सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला
मराठीत माहिती- क्रिकेटर मुरली विजय