सध्या जगभर फक्त कोरोना व्हायरसचा हाहाकार चालू आहे. परिणामत: 15 एप्रिलपर्यंत इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलला स्थगित करण्यात आले आहे. मात्र, जर परिस्थितीत सुधारणा झाली तरच आयपीएलचे आयोजन होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
अशात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) खेळताना पाहण्यासाठी त्याचे चाहते तर खूपच उत्सुक आहेत. धोनीने २०१९च्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर एकदाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही.
सीएसकेने २०१८मध्ये २ वर्षाच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन केले. एवढेच नव्हे तर, पुनरागमन करताच त्याचवर्षी सीएसकेने आयपीएलचे विजेतेपदही पटकावले होते.
मात्र, २०१९मधील त्यांची ही संधी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघामुळे हुकली आणि त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर, जाणून घेऊया त्या संघाविषयी जो नेहमीच सीएसकेला नडत असतो.
आयपीएलमध्ये एकमेव असा संघ आहे ज्यामुळे सीएसकेला सर्वाधिकवेळा पराभव स्विकारायला लागला आहे-
चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) आयपीएलमधील कामगिरी नेहमीच चांगली राहली आहे. आयपीएलच्या इतर संघाविरुद्ध ते दमदार प्रदर्शन करत असतात. मात्र, मुंबई इंडियन्स हा एकमेव असा संघ आहे ज्यांच्या विरुद्ध सीएसकेची कामगिरी थोडी कमजोर ठरते.
आयपीएलमध्ये आतापर्यंत सीएसके आणि मुंबई इंडियन्स संघ २८ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यांपैकी अवघ्या ११ सामन्यात चेन्नईला विजय मिळाला आहे. तर, मुंबई इंडियन्सने १७वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे चेन्नईला आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा मुंबई इंडियन्स संघाकडूनच पराभव स्विकारावा लागला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कॅप्टन कूल धोनीच्या चेन्नईला सतत त्रास देणारे हे ३ खेळाडू
-अशा क्रिकेट टीम ज्यांच्या नावात येतात प्राण्यांची विचित्र नाव
-मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरही धावला कोरोना बाधितांच्या मदतीसाठी