मुंबई | यावर्षी चेन्नई सुपर किंग्ज साखळी फेरीत दुसऱ्या स्थानी कायम राहिले. २०१८ आयपीएल प्ले-आॅफला पात्र ठरणारा ते दुसरा संघ ठरले.
त्यांनी रविवारी झालेल्या सामन्यात पंजाबचा ५ विकेट्सने पराभव केला. आयपीएलचे हे ११ पर्व असुन त्यात चेन्नई सुपर किंग्जने ९ वेळा भाग घेतला. २ वर्ष या संघावर बंदी होती.
या ९ पैकी ९ वेळा चेन्नईने प्ले-आॅफमध्ये प्रवेश केला आहे. या सर्व स्पर्धांमध्ये चेन्नईचे नेतृत्व एमएस धोनीनेच केले आहे. दोन वेळा त्यांनी या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.
या खालोखाल दुसऱ्या स्थानी मुंबई इंडियन्स हा संघ असुन ११ आयपीएलमध्ये त्यांनी ७ वेळा प्ले-आॅफमध्ये प्रवेश केला आहे. प्ले-आॅफमध्ये पात्र ठरल्यावर ७ पैकी ३ वेळा मुंबईला या स्पर्धेचे विजेतेपद जिंकता आले आहे.
५वेळा बेंगलोर या स्पर्धेत प्ले-आॅफमध्ये गेले आहे परंतु एकदाही त्यांना विजेतेपद मिळवता आले नाही.
सर्वाधिक वेळा आयपीएल प्ले-आॅफला पात्र ठरणारे संघ
९- चेन्नई
७- मुंबई
६- कोलकाता
५- बेंगलोर#म #मराठी @MarathiBrain @MarathiRT @Mazi_Marathi @Maha_Sports @BeyondMarathi @kridajagat— Sharad Bodage (@SharadBodage) May 21, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
–एका मुंबईकराने दुसऱ्याला पराभूत करत तिसऱ्या मुंबईकरासाठी खुली केली प्ले-आॅफची दारं
–सिंधुला बॅडमिंटनमध्ये दुहेरीत जोडीदार म्हणुन हवा धोनी !
–२० वर्षाच्या रिषभ पंतने आज जे केले ते अनेकांना ११ आयपीएलमध्ये करता आले नाही
-केवळ १ षटकारामुळे हुकला आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम
–टी२०मध्ये ५२८ चौकार आणि तेवढ्याच षटकारांची बरसात करणारा तो पहिलाच खेळाडू