जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामाला सुरुवात होण्यासाठी अवघ्या 6 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या नव्या हंगामासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केलीये. या दरम्यानच चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे. मागील हंगामात संघासाठी पदार्पण करून जबरदस्त कामगिरी करणारा युवा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी दुखापतग्रस्त असून, तो या हंगामात दिसण्याची शक्यता कमी आहे.
मुकेश चौधरी याने मागील वर्षी घातक गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. महाराष्ट्रासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या मुकेशने आपल्या डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजीने 13 सामने खेळताना 14 बळी आपल्या नावे केलेले. दीपक चहरच्या अनुपस्थितीत तो संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून समोर आलेला. मात्र, यावर्षी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता कमी झाली आहे.
मुकेश पाठीच्या दुखण्यामुळे सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे पुनर्वसन कार्यक्रमातून जातोय. आयपीएल तोंडावर आली असतानाही तो चेन्नईच्या कॅम्पमध्ये दाखल झालेला नाही. या प्रकरणावर बोलताना चेन्नईचे सीईओ कासी विश्वनाथ म्हणाले,
“आम्ही मुकेशची वाट पाहत आहोत. मात्र, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास आम्हाला जास्त अपेक्षा नाहीत. मागील वर्षी तो आमच्या गोलंदाजीचा स्तंभ होता. यावेळी तो उपलब्ध नसल्यास आम्हाला त्याची उणीव भासेल.”
मागील सात वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या मुकेशला गेल्या वर्षी चेन्नईने 20 लाखांच्या आधारभूत किमतीत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. दुखापतग्रस्त दीपक चहरच्या जागी त्याने चेन्नईच्या गोलंदाजीचे नेतृत्व करताना सर्वांना प्रभावित केले. त्यानंतर त्याला इंडिया ए संघाकडून खेळण्याची देखील संधी मिळाली. मात्र, रणजी ट्रॉफी स्पर्धेत झालेल्या दुखापतीपासून तो मैदानावर उतरू शकला नाही.
(CSK Mukesh Chaudhary Might Missed IPL 2023 Due To Back Injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेन्नई वनडेतील पराभवानंतर दिग्गजाने विराटला सुनावले खडे बोल! म्हणाला, “अशा परिस्थितीत फटके खेळताना…”
केकेआरला खिंडार! IPL 2023पूर्वी आणखी एका खेळाडूला मोठी दुखापत, आता कसं होणार?