इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या (आयपीएल) पहिल्या टप्प्याच्या स्थगितीनंतर १९ सप्टेंबरपासून उर्वरित आयपीएल सत्राचे यूएई येथे आयोजन करण्यात आले आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आणखीन वेळ असला तरीही महेंद्रसिंग धोनीसोबत इतर खेळाडूही चेन्नईला येऊन पोहोचले आहेत. त्यामुळे १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२१ च्या राहिलेल्या सामन्यांसाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने (सीएसके) आतापासूनच तयारी चालू केली असल्याचे दिसते.
आयपीएलच्या दुसऱ्या सत्रासाठी सीएसके संघ १३ ऑगस्टपर्यंत यूएईला रवाना होण्याची शक्यता होती. अशात त्यांच्यासाठी वाईट बातमी समोर आली आहे.
सीएसके संघाला दुबईमध्ये जाण्यासाठी यूएई सरकारकडून अनुमती मिळालेली नाही. त्यामुळे सीएसके संघाला यूएईला रवाना होण्यासाठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, सीएसकेमागून मुंबई इंडियन्स संघाला युएईला जाण्याची परवानगी मिळाली आहे. त्यांचा संघ १३ ऑगस्ट रोजी युएईसाठी उड्डाण भरणार आहे.
याबाबत बोलताना सीएसके संघाचे कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ म्हणाले, “आम्हाला यूएईमध्ये जाण्यासाठी तिथल्या सरकारच्या परवानगीची गरज आहे. आम्ही त्याच गोष्टीची वाट पाहत आहोत. त्याचबरोबर सीएसकेच्या खेळाडूंनाच नव्हे तर इतर सदस्यांना देखील विलगीकरणात ठेवले आहे”
“तसेच बीसीसीआय लवकरच तिथल्या सरकारची अनुमती घेईल. त्याचबरोबर आम्हाला असा विश्वासस आहे की, आम्हाला बुधवारपर्यंत यूएईमध्ये जाण्याची परवानगी मिळेल,” असेही सीएसकेचे कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ म्हणाले.
आयपीएलच्या उर्वरित हंगामाच्या तयारीसाठी कर्णधार धोनी सहीत सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, कर्ण शर्मा, ऋतुराज गायकवाड हे सर्व खेळाडू चेन्नईला येऊन पोहोचले आहेत.
दरम्यान, आयपीएलच्या दुसऱ्या सत्रातील उर्वरित ३१ सामने १९ सप्टेंबरपासून होणार आहेत. त्यातील पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्या दरम्यान होणार आहे. यात चेन्नईचा संघ ७ पैकी ५ विजयासह दुसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबईचा संघ ७ पैकी ४ विजयासह चौथ्या स्थानावर आहे. ८ पैकी ६ सामने जिंकत सर्वात जास्त १२ गुणांसह दिल्ली कॅपिटल्स पहिल्या स्थानावर विराजमान आहे.
महत्वाच्या बातम्या –
–युएई वारी! मुंबई इंडियन्सला मिळाली युएईला रवाना होण्याची परवानगी, ‘या’ दिवशी भरणार उड्डाण
–लॉर्ड्स मैदानावर रोहितचा ७६ मीटरचा लांबलचक सिक्स अन् चाहत्यांचा आनंद गगनात; केला भरपूर जल्लोष
–चौकारानंतर चौकार खेचत रोहितने सॅम करनची केली ‘दुर्दशा’, व्हिडिओ जोरदार व्हायरल