इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानात गुरुवार (१२ ऑगस्ट) पासून सुरू झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. यामुळे भारताने पहिल्या दिवसाखेर ३ गडी गमावत २७६ धावा फलकावर नोंदवल्या.
दरम्यान सामन्याच्या १५ व्या षटकात सॅम करनच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी केली. जेव्हा सॅम करेन १५ वे षटक टाकण्यासाठी आला. तेव्हा रोहित शर्माने धडाकेबाज फलंदाजी करत त्याच्या गोलंदाजीला फिके पाडले. रोहितने करनच्या त्या षटकात पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारले होते.
https://twitter.com/AbdullahNeaz/status/1425784272103743489?s=20
रोहितच्या या आक्रमक खेळीनंतर चाहते समाज माध्यमांवर चांगलेच सक्रिय झाले. त्यांनी याबाबत अनेक मजेशीर पोस्ट आणि ट्विट केले. यावर काही मिम्स देखील बनवले जात आहेत. अशाप्रकारे २३ वर्षीय करनला खूप ट्रोल करण्यात आले आहे. करनची धुलाई झाल्यानंतर एकाने लिहिले “यानंतर इंग्लंडच्या संघाने सॅम करनला आता बाहेर बसवू नये” अशाच प्रकारे अनेक मजेशीर पोस्ट आणि कमेंट पाहायला मिळत आहे.
Bus england humare Sam Curran bhai ko nikaal na de -:) https://t.co/ycNnNyZum8
— Viv (@jalebi_thought) August 12, 2021
Sam Curran To #RohitSharma ???? pic.twitter.com/pGBUnJeHDf
— #ThandelonFeb7th ???????????? (@YaswanthParla) August 12, 2021
#ENGvIND #RohitSharma#SamCurran right now:- pic.twitter.com/j3TAV8dXp9
— The Witty Man (@thewittyman1710) August 12, 2021
दरम्यान इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी शतकीय भागीदारी करत भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. रोहित शर्माने अर्धशतकीय खेळी करत ८३ धावसंख्येवर बाद झाला. मात्र केएल राहुलने दिवसाखेर झंझावती खेळी करत नाबाद १२७ धावा केल्या आहेत. तसेच कर्णधार विराट कोहलीही त्याला ४२ धावांची साथ दिली होती.
महत्वाच्या बातम्या –
–पुजाराची विकेट अँडरसनसाठी ठरली विक्रमी, भारताविरुद्ध ‘ही’ किमया साधणारा ठरला पहिलाच गोलंदाज
–‘क्रिकेटर, कर्णधार अन् आता बीसीसीआय अध्यक्ष बनून आलोय’; आजही लॉर्ड्सवर दादाची दादागिरी!
–गुरुनंतर शिष्याची शंभरी! क्रिकेटच्या पंढरीत राहुलची सेंचूरी, तब्बल ३१ वर्षांनंतर झाला हा पराक्रम






