---Advertisement---

पुजाराची विकेट अँडरसनसाठी ठरली विक्रमी, भारताविरुद्ध ‘ही’ किमया साधणारा ठरला पहिलाच गोलंदाज

On: शुक्रवार, ऑगस्ट 13, 2021 6:14 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. परंतु हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरल्याचे दिसून आले. भारतीय सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली.

परंतु रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजाराला पुन्हा एकदा साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. मात्र चेतेश्वर पुजाराची विकेट इंग्लंडच्या अनुभवी वेगवान गोलंदाजासाठी विक्रमी ठरली आहे.

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि केएल राहुलने चांगली सुरुवात करून देत शतकी भागीदारी केली होती. परंतु ८३ धावा करून रोहित शर्मा माघारी परतला होता. त्यानंतर चेतेश्वर पुजारा फलंदाजी करण्यासाठी आला होता. तो लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती. परंतु या सामन्यात देखील त्याला चांगली सुरुवात मिळाली नाही आणि तो अवघ्या ९ धावा करत माघारी परतला.

पहिल्या डावातील ५० व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जेम्स अँडरसनने त्याला बाद करत माघारी धाडले. जेम्स अँडरसनने अप्रतिम चेंडू टाकला होता, तो पुजाराच्या बॅटचा कडा घेत तिसऱ्या स्लिपवर असलेल्या जॉनी बेयरस्टोच्या हातात गेला होता.

जेम्स अँडरसनने या डावात अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने सुरुवातीला रोहित शर्माला ८३ धावांवर बाद करून माघारी धाडले. त्यानंतर त्याने पुजाराला ९ धावांवर बाद केले. यासह त्याने पुजाराला कसोटी क्रिकेटमध्ये ९ वेळेस बाद करण्याचा कारनामा केला आहे. या यादीत सर्वोच्च स्थानी ऑस्ट्रेलियन संघाच्या पिटर सिडलचा समावेश आहे. त्याने चेतेश्वर पुजाराला ११ वेळेस बाद करून माघारी धाडले आहे.(James Anderson dismiss cheteshwar pujara 9th time)

याव्यतिरिक्त पुजारा ही अँडरसनची लॉर्ड्च्या मैदानावरील ३० वी विकेट होता, तर रोहित २९ वी विकेट होता. पुजाराला बाद करत अँडरसनने एकाच मैदानावर भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचाही किर्तीमान केला आहे.

एका मैदानावर भारत विरुद्ध सर्वाधिक विकेट्स (कसोटी)
३० विकेट्स (लॉर्ड्स)- जेम्स अँडरसन
२९ विकेट्स (कोलंबो एसएससी)- मुथैय्या मुरलीधरन
२६ विकेट्स (ऍडलेड ओव्हल)- नाथन लायन
२४ विकेट्स (कराची)- इम्रान खान

महत्त्वाच्या बातम्या-

‘क्रिकेटर, कर्णधार अन् आता बीसीसीआय अध्यक्ष बनून आलोय’; आजही लॉर्ड्सवर दादाची दादागिरी!

गुरुनंतर शिष्याची शंभरी! क्रिकेटच्या पंढरीत राहुलची सेंचूरी, तब्बल ३१ वर्षांनंतर झाला हा पराक्रम

राहुलने गाठला वीरू! खणखणीत शतकासह विक्रमांची घातली रास, सेहवागचीही केली बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---