इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या अठराव्या हंगामातील 49 सामने खेळले गेले आहेत. बुधवार 30 एप्रिल रोजी पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाबने चेन्नईचा पराभव करत 4 गडी राखून विजय मिळवला. धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई पहिला संघ ठरला आहे जो, प्लेऑफ मधून तसेच या स्पर्धेतून अधिकृतरित्या बाहेर पडला आहे. सलग ही दुसरी वेळ आहे, जेव्हा चेन्नई प्लेऑफमध्ये स्थान निर्माण करू शकली नाही.
रजत पाटीदारच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात वरच्या स्थानावर आहे. त्यांनी 10 मधील 7 सामने जिंकले आहेत आणि 3 सामन्यात पराभव पत्करला आहे. त्यांचा नेट रन रेट +0.521 आहे.
बुधवारी चेन्नईला पराभूत केल्यानंतर पंजाब पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. त्यांनी 10 मधील 6 सामने जिंकले आहेत. तसेच त्यांचा एक सामना रद्द झाला होता. 13 गुणांसोबत त्यांचा नेट रन रेट +0.1999 आहे. तिसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्स आहे, ज्यांनी 10 मधील 6 सामने जिंकले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई संघाचा नेट रन रेट + 0.899 आहे.
चौथ्या स्थानावर गुजरात टायटन्स आहे. गिलच्या नेतृत्वातील या संघाने 9 मधील 6 सामने जिंकले आहेत. त्यांचा नेट रन रेट + 0.748 आहे. हे चार संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या दावेदार आहेत. पण अजून दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स टॉप चार साठी लढत आहेत.
दिल्ली कॅपिटल पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी 10 मधील 6 सामने जिंकले आहेत. त्यांचे 12 अंक आहेत. सहाव्या स्थानावर लखनऊ संघ आहे, ज्यांनी 10 मधील 5 सामने जिंकले आहेत. हे दोन्ही संघ सुद्धा प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या दावेदार आहेत. कोलकाता संघासाठी प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचे असेल.
कोलकाताने 10 मधील 4 सामने जिंकले आहेत. त्यांनी जर सर्व सामने जिंकले तर त्यांचे 17 गुण होतील. जर एकही सामना ते पराभूत झाले तर, त्यांचे पूर्ण समीकरण बाकीच्या संघांवर अवलंबून राहील. केकेआर सध्या सातव्या स्थानावर आहे.
राजस्थान रॉयल्सने 10 मधील फक्त 3 सामने जिंकले आहेत आणि ते आठव्या स्थानावर आहेत. इथून पुढे जर राजस्थान एकही सामना पराभूत झाली, तर ते प्लेऑफ मधून बाहेर होतील. हैदराबादने 9 मधील 3 सामने जिंकले आहेत आणि त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रत्येक सामना जिंकावा लागेल.





