क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरुपात अर्थात टी२० स्वरुपातील क्रिकेट संघात टिकून राहणे, हे क्रिकेटपटूंसमोरील सर्वात मोठे आव्हान असते. टी२० स्वरुपात टिकूर राहण्यासाठी फलंदाजांना कमीतकमी चेंडूंचा सामना अधिकाधिक धावा कराव्या लागतात, तर गोलंदाजांना कमीतकमी धावा देत अधिकाधिक विकेट्स घ्याव्या लागतात. त्यामुळे भारताचा कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा टी२० प्रकारातील इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे.
तब्बल ७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्याला विकत घेतले. परंतु त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. यानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
यूट्यूबवरील कार्यक्रम माइंड मैटर्समध्ये बोलताना पुजाराने आयपीएलमधून बाहेर राहिल्याने दु:ख झाल्याचे सांगितले आहे. लिलावात कित्येकदा दुर्लक्षित राहिल्यामुळे आपल्या दु:खाने परिसीमा गाठल्याचे त्याने सांगितले आहे.
आयपीएलमध्ये अनसोल्ड राहणे सोपे नसते
पुजारा म्हणाला की, “हे फार कठीण होते. आयपीएलमधून बाहेर होणे आणि लिलावात अनसोल्ड राहणे सोपे नव्हते. यामुळे मला खूप दु:ख होत असे. परंतु या अशा गोष्टी आहेत, ज्या माझ्या हातात नाहीत. याबाबतीत मी काहीही करु शकत नाही. एकवेळ अशी आली की, मी ठरवले आता हार न मानता माझ्यातील कमतरेंवर लक्ष केंद्रित करायचे. मी नेहमीच मर्यादित क्रिकेटमधील माझ्या प्रदर्शनात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे.”
चेतेश्वर पुजाराची आयपीएल कारकिर्द
पुजाराने २०१० साली आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने पदार्पणात १६ चेंडूत १० धावा केल्या होत्या. त्यानंतर पुजाराने किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेही प्रतिनिधित्व केले. पण त्याला मोठी छाप पाडण्यात अपयश आले. त्यामुळे २०१४ नंतर त्याला कोणत्याही संघाने पसंती दाखवली नव्हती. त्याने २०१४ साली शेवटची आयपीएल स्पर्धा खेळली होती.
पण अखेर पुजाराला यंदाच्या आयपीएल हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सने ५० लाखांची बोली लावत संघात घेतले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून आयपीएल लिलावात सहभाग घेत असलेल्या पुजाराची ७ वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. परंतु आयपीएल २०२१ मध्ये चेन्नईने त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिली नाही. पुजाराने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत खेळताना ३० सामन्यांत ३९० धावा केल्या आहेत. तसेच यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिला डोस; शिखर धवनपाठोपाठ मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने घेतली कोरोना लस
धोनी तो धोनीचं, ‘ते’ कौतुकास्पद कार्य एकटा ‘कॅप्टनकूल’च करु शकतो; माजी क्रिकेटरने केली स्तुती
कोहली, धवन की अजून कोणी; टी२० विश्वचषकात रोहितचा सलामी जोडीदार कोण असेल?