---Advertisement---

Tushar Deshpande Marriage: CSK चा खेळाडू तुषार देशपांडे अडकला लग्नबंधनात, ‘स्कूल क्रश’सोबत घेतले सात फेरे

On: शुक्रवार, डिसेंबर 22, 2023 3:56 PM
Tushar-Deshpande
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू तुषार देशपांडे विवाहबंधनात अडकला आहे. तुषारने नभा गडमवार हीला आपला जीवनसाथी बनवले आहे. सीएसकेचा खेळाडू तुषारने त्याच्या लग्नाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने पत्नी नभासोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत. तुषारच्या लग्नात जवळच्या नातेवाईकांसह काही मित्रांनाही आमंत्रित करण्यात आले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार तुषार देशपांडे (Tushar Deshpande) आणि नभा गडमवार (Nabha Gadamwar) शाळेच्या काळापासून एकमेकांना ओळखतात. यानंतर त्यांनी कॉलेजमध्येही एकत्र शिक्षण घेतले. आता हे दोघेही लग्नाच्या बंधनात बांधले अडकले आहेत. तुषारने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. 21 डिसेंबरला दोघांचे लग्न झाले. यापूर्वी 12 जून रोजी एंगेजमेंट झाली होती. नभा ही तुषारची शालेय क्रश होती आणि आता अनेक वर्षांनी दोघांनी लग्न केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tushar Deshpande (@tushardeshpande96)

तुषार हा चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. त्याने अनेक प्रसंगी संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. तुषारचा देशांतर्गत सामन्यांमध्येही चांगला रेकॉर्ड आहे. तुषारच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर तो आतापर्यंत 23 सामने खेळला आहे. या त्याने कालावधीत 25 विकेट्स घेतल्या आहेत. तुषारची आयपीएल सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 45 धावांत 3 विकेट्स आहे. तुषारने 30 प्रथम श्रेणी सामन्यात 81 विकेट्स घेतल्या आहेत. तर 40 लिस्ट ए सामन्यात 51 विकेट्स घेतल्या आहेत. यासह त्याने आतापर्यंत खेळलेल्या 67 टी20 सामन्यांमध्ये 99 विकेट्स घेतल्या आहेत. (CSK Player Tushar Deshpande Gets Married Takes Seven Rounds With School Crush)

हेही वाचा

भारताला मोठा धक्का; आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विराट परतला भारतात, तर ऋतुराज झाला मालिकेतून बाहेर
IND vs SA: मोठा खुलासा; ऋतुराज गायकवाड का खेळला नाही तिसरा सामना, समोर आले मोठे कारण

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---