Head Coach Gautam Gambhir :- भारतीय पुरुष क्रिकेट संघ या महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. ज्यामध्ये भारतीय संघाला 3 टी20 तर 3 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. ज्याची सुरुवात 27 जुलै पासून होणार आहे. तर या दाैऱ्यासाठी बीसीसीआयने गुरुवारी (18 जुलै) भारतीय संघाची घोषणा केली. मात्र, दोन्ही संघातून चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळणाऱ्या खेळाडूंना डावलण्यात आल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे.
नवा भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व निवड समिती यांनी या दोन्ही संघांची घोषणा केली. यामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली. कोलकाता नाईट रायडर्ससाठी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या श्रेयस अय्यर याचे भारतीय संघात पुनरागमन झाले. तर, कोलकात्याचा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला प्रथमच भारतीय संघात जागा मिळाली. तर यापूर्वी कोलकत्ता संघाचा भाग राहिलेल्या सूर्यकुमार यादव याला कर्णधार व शुबमन गिल याला उपकर्णधार बनवले गेले.
One day Rutu will lead India and win World Cup for India!🥹❤️🇮🇳
WE WANT RUTU BACK#RuturajGaikwad pic.twitter.com/itZRSQYeyx— JD raja (@itzraja_23) July 20, 2024
If I say something people will counter you are a CSK fan 🤡🤡
You are dropping current 2nd best T20 batsman of india @GautamGambhir
That’s the reason I am loosing interest in cricket , too much politics in everywhere 🤮🤮🤮
Absolute shameful @BCCI #Gambhir #RuturajGaikwad pic.twitter.com/jA5lidKSqM— Samprit (@its_Sampritbera) July 18, 2024
Gautam Gambhir is so jealous of MS Dhoni that he is taking revenge on a youngster by not selecting him, and the rest of the IPL fans are not supporting him because he plays for CSK.#RuturajGaikwad 💔🥀 pic.twitter.com/9PJf1jUcwL
— ఏకాకి™ 🚩 (@yekakii) July 20, 2024
असे असतानाच, झिम्बाब्वे दौऱ्यावर उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतरही चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा संघात आपली जागा बनवू शकला नाही. त्याची निवड न झाल्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गौतम गंभीर याच्यावर टीका करण्यात येत आहे. यासोबतच अनुभवी रवींद्र जडेजा याला देखील वनडे संघातून बाहेर करण्यात आले. तो सीएसकेचा उपकर्णधार आहे.
यासोबतच झिम्बाब्वे दौऱ्यावर पदार्पण करणारा युवा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे हा देखील संघात पुन्हा एकदा जागा मिळवण्यात अपयशी ठरला. मागील बऱ्याच काळापासून संघाबाहेर असलेला शार्दुल ठाकूर व दीपक चहर यांच्या नावाची चर्चा देखील न झाल्याचे सांगण्यात येत आहे. गौतम गंभीरने जाणीवपूर्वक एमएस धोनी याच्या जवळच्या खेळाडूंना डावलले असल्याचा आरोप सोशल मीडियामधून होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
गौतम गंभीरची इच्छा पूर्ण! टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये दाखल होणार केकेआरमधील साथीदार
‘आलीशान कार आणि घर, वर्षाला करोडो रुपयांची कमाई’, नव्या कर्णधाराची एकूण संपत्ती जाणून व्हालं थक्क!
‘हिम्मत असेल तर…’,मोहम्मद शमीने सानिया मिर्झासोबत लग्नाबाबतच्या अफलवांवर तोडले मौन