टॉप बातम्याक्रिकेट
सीएसके म्हणतंय, अशी आयपीएल घेण्यात काय अर्थ
कोरोना व्हायरसमुळे जगात सध्या जी वैश्विक महामारीची समस्या उभी राहिली आहे त्यामुळे आयपीएलवरही त्याचा परिणाम झाला आहे. ही स्पर्धा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
त्यामुळे तिच्या आयोजनाबद्दल रोज नवनवीन भाष्य क्रिकेट जगताशी संबंधित व्यक्तींकडून केलं जातं. यात ही स्पर्धा परदेशी खेळाडूंशिवाय खेळवावी, असाही एक पर्याय सुचविण्यात आला होता.
परंतु याला चेन्नई सुपर किंग्ज अर्थात सीएसकेच्या संघव्यवस्थापनाचा विरोध आहे.
“परदेशी खेळाडूंशिवाय आयपीएल घेण्याबाबत सीएसके अजिबात उत्सुक नाही. असं होणं म्हणजे सईक मुश्ताक अली स्पर्धा परत घेण्यासारखं आहे. सीएसके फ्रचांईजी गेले काही दिवस बीसीसीआयच्या संपर्कात नाही,” असेही सीएसकेमधील सुत्रांनी सांगितले.
सीएसके ही आयपीएलमधील मुंबई इंडियन्सनंतरची सर्वात यशस्वी फ्रचांईजी आहे.