इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ चा उर्वरित हंगाम सुरू होण्यासाठी जवळपास एका महिन्याचा कालावधी उरला आहे. १९ सप्टेंबरपासून युएई येथे आयपीएलचे राहिलेले सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेला चेन्नई सुपर किंग्ज संघ (सीएसके) आतापासूनच आयपीएलच्या तयारीला लागला आहे. पुढील आठवड्यात सीएसके संघ युएईला रवाना होणार आहे. तत्पुर्वी संघातील खेळाडू चेन्नई येथे एकत्र जमायला सुरुवात झाली आहे.
मंगळवार रोजी (१० ऑगस्ट) आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी चेन्नईला पोहोचला आहे. चेन्नई विमानतळावरील त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तसेच सीएसकेनेही त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर धोनीचा फोटो शेअर केला आहेत.
धोनीच्या आधी सीएसकेचे स्टार खेळाडू रॉबिन उथप्पा, कर्ण शर्मा आणि ऋतुराज गायकवाड हे देखील चेन्नईला पोहोचले आहेत. याचसोबत अंबाती रायडूही चेन्नईला पोहोचला आहे. धोनीसह सर्व खेळाडूंना चेन्नईत काही दिवस विलगिकरनात राहावे लागणार आहे. त्यानंतर सीएसकेचा ताफा युएईला रवाना होईल.
Lion Day Entry 🔥
📍Anbuden Chennai#ThalaDharisanam #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/Ci2G4vBuEQ
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 10, 2021
💛 #MSDhoni has arrived in chennai ahead of #IPL2021.#CSK #WhistlePodu #IPL pic.twitter.com/mlB4FAlNKE
— The Cricket Alert (@TheCricketAlert) August 10, 2021
Some 💛 four your evening!#HomeSweetDen #WhistlePodu #Yellove 🦁 @robbieuthappa @sharmakarn03 pic.twitter.com/fdIXG0ezwu
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 9, 2021
तसे पाहता, आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा दुसरा टप्पा पुढील महिन्यात यूएईमध्ये होणार आहे. आयपीएलचा हा हंगाम कोरोनामुळे २९ सामन्यांनंतरच पुढे ढकलण्यात आला. उर्वरित सामने आता युएईच्या अबु धाबी, शारजाह आणि दुबई मैदानावर होणार आहेत.
धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके संघ १३ किंवा १४ ऑगस्टला यूएईला रवाना होईल आणि तेथे सराव सुरू करेल. तथापि, या तारखेवर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेला नाही. युएईतही खेळाडूंनी सरावास सुरुवात करण्यापूर्वी त्यांना काही दिवस विलगिकरणात ठेवणे आवश्यक असेल.
Look who arrived.! 😎🔥@MSDhoni | #MSDhoni | #WhistlePodu pic.twitter.com/c3BrXbmd6u
— Amit Ahir 🇮🇳 (@iamitahir) August 10, 2021
सीएसकेची नजर चौथ्या जेतेपदावर
धोनीच्या नेतृत्त्वाखाली सीएसके संघाने आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यात ७ सामने खेळले असून त्यापैकी ५ सामने जिंकले आहेत. तर २ सामन्यांत त्यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. अशाप्रकारे १० गुणांची कमाई करत सीएसके संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. उर्वरित हंगामातही हीच लय कायम राखत चौथ्यांदा चषक जिंकण्याचा सीएसके संघाचा इरादा असणार आहे. त्यांनी आतापर्यंत २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये आयपीएल जेतेपद पटकावले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघाची घोषणा; विलियम्सनकडे नेतृत्त्वपद, तर ‘या’ खेळाडूंना मिळाली जागा
बीसीसीआय अध्यक्ष गांगुली पाहायला येतोय लॉर्ड्स कसोटी सामना, पण का? जाणून घ्या कारण
इंग्लंडमध्ये ‘लेडी सेहवाग’चा डंका! २२ चेंडूत ठोकलं अर्धशतक, सर्वोच्च भागिदारीचाही केला विक्रम