---Advertisement---

चेन्नईच्या चक्रव्यूहात अडकतील विरोधक? फिरकीपटूंचा खेळ रंगणार!

On: शुक्रवार, मार्च 21, 2025 6:24 PM
---Advertisement---

आगामी आयपीएल स्पर्धा 2025 उद्यापासून म्हणजेच 22 मार्चपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी चेन्नई सुपर किंग्स बद्दल माहिती समोर येत आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाला त्यांच्या घरेलू मैदानावर म्हणजेच चेपॉकच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळते. तसेच या संघाचे फिरकीपटू विरोधी संघाच्या फलंदाजांना अडचणीत टाकू शकतात. या गोष्टीत कोणतीही शंका नाही की, चेन्नई सुपर किंग्स संघाकडे खूप चांगले फिरकीपटू गोलंदाज आहेत. चेन्नई सुपर किंग्स संघाकडे रवी अश्विन शिवाय नूर अहमद, रचिन रवींद्र, रवींद्र जडेजा आणि श्रेयस गोपाल यांच्यासारखे फिरकीपटू आहेत. मागच्या दिवसात आयपीएलच्या मेगा लिलावात सीएसकेने रवी अश्विनला 9.75 करोड रुपयांना खरेदी केले होते. त्याआधी राजस्थान रॉयल्सने रवी अश्विनला रिलीज केले होते.

आत्तापर्यंत आयपीएल सामन्यांमध्ये रवी अश्विनने 180 विकेट्स घेतलेल्या आहेत. तसेच चेपॉकच्या खेळपट्टीवर रवी अश्विनच खेळणं विरोधी संघाच्या फलंदाजांसाठी मोठं आव्हान असणार आहे. याशिवाय रवींद्र जडेजाने आयपीएलच्या 240 सामन्यात 160 विकेट्स घेतलेल्या आहेत. तसेच चेपॉकची खेळपट्टी रवींद्र जडेजाला खूप आवडते. रवींद्र जडेजा आणि अश्विन शिवाय अफगाणिस्तानचा नूर अहमद सुद्धा फलंदाजांवर चांगलाच भारी पडू शकतो. आत्तापर्यंत नूर अहमदने त्याच्या आयपीएल करिअरमध्ये 23 सामने खेळलेले आहेत. ज्यामध्ये त्याने विरोधी संघाच्या 24 फलंदाजांना बाद केले आहे.

या फिरकीपटू गोलंदाजांशिवाय चेन्नई सुपर किंग्स संघाकडे श्रेयस गोपाल आणि रचिन रवींद्र असणार आहेत. आयपीएलच्या 52 सामन्यात श्रेयश गोपालने 52 खेळाडूंना बाद केले आहे. तसेच आत्तापर्यंत आयपीएलच्या सामन्यात रचिन रवींद्रच्या नावावर एकही विकेट नाही. पण या गोष्टीत कोणतीही शंका नाही की, चेपॉकच्या खेळपट्टीवर न्यूझीलंडचा हा खेळाडू खतरनाक ठरू शकतो. याशिवाय चेन्नई सुपर किंग संघाकडे अष्टपैलू दीपक हुडा सारखा खेळाडू आहे, ज्याच्या नावावर आयपीएल सामन्यांमधील 10 विकेट्स आहेत. या खेळाडूंच्या आधारे म्हटले जात आहे की, चेन्नई सुपर किंग्स संघाकडे स्पर्धेतील सर्वात चांगली फिरकी फौज आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---