आयपीएल 2023 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्स व गुजरात टायटन्स हे संघ आमने-सामने आले होते. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सीएसकेने गुजरातला 15 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत जागा मिळवली. साखळी फेरीतील सातत्यपूर्ण कामगिरीनंतर क्वालिफायरमध्ये देखील दर्जेदार खेळ दाखवत चेन्नईने इथपर्यंत मजल मारली. चेन्नईच्या या यशात युवा वेगवान गोलंदाज तसेच बेबी मलिंगा नावाने ओळखल्या जाणाऱ्या मथिशा पथिराना याचे मोलाचे योगदान राहिले आहे.
ड्वेन ब्राव्हो निवृत्त झाल्याने तसेच मुकेश चौधरी व दीपक चहर दुखापतग्रस्त असल्याने चेन्नईची वेगवान गोलंदाजी युवा खेळाडूंच्या खांद्यावर होती. तुषार देशपांडे व राजवर्धन हंगरगेकर यांनी संघासाठी काहीशी महागडी सुरुवात केलेली. मात्र, त्यानंतर श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना याला संघात संधी मिळाली. श्रीलंकेचा सर्वकालीन महान वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याच्यासारखी गोलंदाजी शैली असलेल्या पथिरानाने ही संधी साधली. त्याने प्रत्येक वेळी डेथ ओवर्समध्ये आपल्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी केली.
या हंगामातील त्याची आकडेवारी पाहिल्यास त्याने 16 ते 20 या षटकांमध्ये गोलंदाजी करताना 26.2 षटके टाकली. यामध्ये 16 बळी मिळवण्यात त्याला यश आले. त्याची सरासरी 12 तर स्ट्राईक रेट 9.88 असा राहिला. विशेष म्हणजे त्याचा इकोनॉमी रेटही 7.78 असा शानदार राहिला आहे. विशेष म्हणजे त्याने टाकलेल्या 158 पैकी 65 चेंडू निर्धाव राहिले आहेत.
पथिराना याने अद्याप श्रीलंकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही. काही दिवसांपूर्वीच धोनीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला त्याचा योग्य वापर करण्याचा सल्ला दिलेला. केवळ महत्त्वाच्या मालिका तसेच आयसीसी स्पर्धांमध्ये त्याला खेळवावे व कसोटी क्रिकेटपासून दूर ठेवावे, अशी विनंती केली होती.
(CSK Success Unsung Hero Matheesha Pathirana Stats In Death Overs Of IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“मला रैनासारखे योगदान द्यायचेय”, सीएसकेचा ‘राजकुमार’ ऋतुराजची प्रांजळ कबुली
शेवटी सीएसकेनेच करून दाखवलं! दोन वर्षात पहिल्यांदा गुजरातवर ओढवली ‘ही’ नामुष्की






