एमएस धोनी, हे क्रिकेटमधील खूप मोठे नाव आहे. धोनीला भेटण्यासाठी चाहत्यांबरोबरच क्रिकेटपटूही आतुर असतात. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) फ्रँचायझीचा थ्रोडाऊन स्पेशलिस्ट कोंडप्पा राज पलानी याने धोनीसोबतच्या आपल्या पहिल्या मुलाखतीचा किस्सा सांगितला आहे. जेव्हा धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची केली होती, तेव्हा पहिल्यांदा कोंडप्पा धोनीला प्रत्यक्षात भेटला होता.
धोनीने (MS Dhoni) १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आयपीएलचा तेरावा हंगाम सुरू होण्यापूर्वी सीएसकेच्या कॅम्पमध्ये असताना धोनीने निवृत्तीची घोषणा केली होती. परंतु तो आयपीएलमध्ये खेळणार होता. त्यामुळे धोनी सीएसकेच्या कॅम्पमध्ये सराव होता. यावेळी स्वत: धोनीने कोंडप्पाला (Kondappa Raj Palani) थ्रोडाऊन करायला सांगितले होते.
हा किस्सा सांगताना कोंडप्पा म्हणाला की, “धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सीएसकेच्या कॅम्पमध्ये सराव करत असताना मी पहिल्यांदा त्याला पाहिले होते. त्याने मला थ्रोडाईन करायला सांगितले होते. स्टिफन फ्लेमिंग, माईक हसी आणि सर्वांनी मला सांगितले होते की, धोनी येतोय. मला त्याला सावधानीने गोलंदाजी करायची आहे. मी धोनीला चेंडू टाकले. यातील पहिले २ चेंडू वाइड होते. पुढचा चेंडू फुल टॉस होता. मग धोनी माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला की, मला बघणं बंद कर आणि गोलंदाजी कर.”
“थोडक्यात धोनीने मला माझा नैसर्गिक खेळ खेळण्यास सांगितले होते. मग मी जिथे माझी मर्जी असेल, तिथे गोलंदाजी करायला सुरू केली. मग धोनी खूप खुष झाला होता. त्याने दररोज मला माझ्या नावाने संबोधित करायला सुरुवात केली होती”, असे त्याने पुढे म्हटले.
महत्त्वाचे म्हणजे, कोंडप्पा हा सीएसकेचा एकमेव थ्रोडाऊन स्पेशलिस्ट (CSK Throwdown Specialist) नव्हता, ज्याला धोनीला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. कोंडप्पाचा साथी मुरुगन यालाही सीएसकेच्या या दिग्गज क्रिकेटरला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती.
मुरुगन आपला धोनीसोबतचा अनुभव सांगताना म्हणाला की, “धोनी अधिकतर मला फ्रँट फुट गोलंदाजी करायला सांगायचा. तो मला सांगायचा की, विकेट घेणे पुढचे काम आहे. त्याआधी फ्रँट फुट गोलंदाजीचा अनुभव घ्या. मग मी त्याला तशी गोलंदाजी करायला सुरुवात केली होता.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हमारी छोरियां छोरो से कम है के? राधा यादवचा झेल बघून तुम्ही पण व्हाल दंग
एलिमिनेटर सामन्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आरसीबीच्या दिनेश कार्तिकला दंड, कारण गुलदस्त्यात
IPL | कशी आहे नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी, जिथे रंगणार क्वालिफायर आणि फायनलचा थरार; घ्या जाणून