रविवार रोजी (२६ सप्टेंबर) अबु धाबी येथे कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स (केकेआर वि. सीएसके) यांच्या दरम्यान आयपीएलचा ३८ वा सामना होतो आहे. या सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात प्रेक्षकांनी मैदानावर चांगलीच गर्दी केली आहे, ज्यामुळे सामन्याचा रोमांच आणि मजा दुप्पट झाली आहे. दरम्यान, एका चाहत्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. परंतु हा फोटो सीएसके आणि केकेआर यांच्यातील सामन्याचा नसून सीएसके आणि आरसीबी सामन्यादरम्यानचा आहे.
२४ सप्टेंबर रोजी सीएसके विरुद्ध आरसीबी यांच्यात हाय व्होल्टेज सामना झाला होता. या सामन्यात तो चाहता पोस्टर घेऊन मैदानात पोहोचला होता. या पोस्टरची चर्चा सगळीकडे होतांना दिसत आहे. सीएसके संघानेही या चाहत्याचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करून एक मजेदार संदेश लिहिला आहे.
आयपीएलमध्ये धोनीच्या संघाचे अर्थात सीएसके संघाचे करोडो चाहते आहेत. स्टार खेळाडूंनी भरलेला हा संघ चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. असाच एक चाहता आरसीबी आणि सीएसके यांच्यातील सामना पाहण्यासाठी आला होता. त्याने त्याच्यासोबत एक छोटे पोस्टरही आणले होते. या चाहत्याने आपल्या पोस्टरद्वारे लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसेच सीएसके संघाला चिमटा काढण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु सीएसकेने या चाहत्याला अतिशय मजेदार उत्तर दिले.
सामन्यादरम्यान पोस्टर चाहत्याच्या हातात होते आणि त्याने आरसीबी संघाची जर्सी घातली होती. पोस्टरवर लिहिले होते, ‘माझी पत्नी मला माझी सीएसकेची जर्सी घालू देत नाही.’ हा फोटो सीएसकेने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. सीएसकेने फोटो शेअर केले आणि लिहिले की, ‘प्रेम आंधळे असते.’
Love is colour blind ❤️💛#RCBvCSK #WhistlePodu #Yellove 🦁 pic.twitter.com/C7oMPEJjfI
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 25, 2021
दरम्यान दुसऱ्या टप्प्यात पहिल्यांदाच सीएसके आणि केकेआरचा संघ समोरासमोर येत आहे. तसेच, हा सामना खूप चुरशीचा असणार आहे, कारण दोन्ही संघ चांगल्या लयीत आहेत. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात दोन्ही संघांनी आतापर्यंत २-२ सामने खेळले आहेत आणि दोन्ही संघांनी यात विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत धोनी आणि मॉर्गनच्या नजरा विजयाच्या हॅट्रिकवर असतील.
महत्त्वाच्या बातम्या-
डीआरएसनं वाचवलं, पण रायुडूच्या ‘बाज की नजरे’पासून वाचणं लई कठीण बुवा! पाहा शुबमनचा रनआऊट
मनात किती खोट म्हणावं!! लाईव्ह सामन्यात डगआऊटमधून कर्णधार मॉर्गनला प्रशिक्षकांच्या खाणाखुणा
CSKvsKKR, Live: शार्दुल-हेजलवुडचा भेदक मारा, त्रिपाठीच्या ४३ धावांमुळे केकेआरच्या ६ बाद १७१ धावा