मुंबई । इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध शुक्रवारी (25 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) च्या खेळाडूंनी, प्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रह्मण्यम आणि ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हाताला काळीपट्टी बांधली होती.
सीएसकेने आपल्या ट्विटरवर लिहिले आहे की, “चेन्नई सुपर किंग्जने डीन जोन्स आणि एसपी बालासुब्रह्मण्यम यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ काळी पट्टी बांधली आहे. चेपॉक (एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई) मध्ये जोन्सची उत्कृष्ट कामगिरी होती. बालासुब्रह्मण्यम यांनी बर्याच मार्गांनी आपले जीवन बदलले.”
The Super Kings are wearing black armbands in memory of Dean Jones and SP Balasubrahmanyam. One had an absolutely iconic day at Chepauk, the other's life has changed and shaped all of us in so many ways. 🦁💛 #RIPSPB #RIPDeanJones #WhistleFromHome #WhistlePodu #Yellove #CSKvDC
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 25, 2020
तसेच जोन्स यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडूही काळी पट्टी बांधून मैदानात उतरले होते.
एसपी बालसुब्रह्मण्यम यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यांचे शुक्रवारी (25 सप्टेंबर) चेन्नईमध्ये त्यांचे निधन झाले. तर गुरुवारी डीन जोन्स यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, त्यावेळी ते 59 वर्षांचे होते.