तब्बल 52 दिवस सलग चाललेल्या आयपीएल 2023 च्या साखळी फेरीची रविवारी (21 मे) समाप्ती झाली. अखेरच्या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीला पराभूत केल्याने मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर विराजमान झाली व त्यांना प्ले ऑफ्सचे तिकीट मिळाले. मंगळवारी (23 मे) प्ले ऑफ्सचे सामने सुरू होतील. आयपीएल इतिहासात डोकावून पाहिल्यास प्ले ऑफ सामन्यांमध्ये चेन्नईचा माजी फलंदाज सुरेश रैना याने एकतर्फी वर्चस्व गाजवलेले दिसून येते.
सुरेश रैना हा 2008 ते 2021 (2020 वगळून) या कालावधीत आयपीएल खेळला. यातील केवळ दोन वर्ष तो गुजरात लायन्स संघाचा भाग होता. तर इतर प्रत्येक वेळी त्याने चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व केले. त्याने तब्बल अकरा वरृष चेन्नईसाठी प्ले ऑफ खेळले. तर, एकदा गुजरातसाठी त्याने ही कमाल केली. केवळ प्ले ऑफमध्ये त्याची कामगिरी पाहायला गेल्यास 24 डावांत 714 धावा करताना सात अर्धशतके झळकावली आहेत. यामध्ये 40 षटकार व 51 चौकार सामील आहेत.
आयपीएलच्या क्लॉलिफायर, एलिमिनेटर आणि अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेला सुरेश रैना एकमेव खेळाडू आहे. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा चेन्नई सुपर किंग्स रैनाच्या अनुपस्थितीत प्ले ऑफमध्ये खेळेल.
मि. आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रैनाच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्याची जबरदस्त आकडेवारी दिसून येते. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 205 सामने खेळताना 32 51 च्या सरासरीने 55.28 धावा केल्या आहेत. यामध्ये 39 अर्धशतके व एका शतकाचा समावेश होतो. तसेच त्याचा स्ट्राईक रेट देखील 136 इतका उच्च राहिला आहे. चेन्नई सुपर किंग्सने जिंकलेल्या चारही विजेतेपदावेळी तो संघाचा सदस्य होता.
(CSK Veteran Suresh Raina Awesome Record In IPL Play Offs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीचा रागराग करणाऱ्यांना हार्दिकने दोनच शब्दात केले गार; म्हणाला, ‘तसंच करायचंय ना मग…’
धोनी, हार्दिक, ईशान आणि कृणाल पंड्याने केली पार्टी? मुंबई प्लेऑफमध्ये पोहोचताच व्हिडिओ व्हायरल