चेन्नई सुपर किंग्स संघाला आयपीएलच्या १५ व्या हंगामात सलग तीन सामन्यांमध्ये अपयश आले आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात संघाला ५४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. सीएसके संघाला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने, तर दूसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने पराभूत केले. तिसऱ्या सामन्यात एमएस धोनी बाद झाल्यानंतर पंजाबचा यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्माने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात कर्णधार मयंक अगरवालला डीआरएस घेण्यास भाग पाडले आणि त्याचा संघाला फायदा झाला. धोनी बाद झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.
माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) ७ व्या क्रमांकावर आला होता. त्याने २८ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २३ धावा केल्या. पण तो सीएसकेच्या (CSK) १८ व्या षटकात राहुल चाहरच्या चेंडूवर बाद झाला. विशेष म्हणजे सुरुवातीला पंजाबच्या अपीलवर पंचांनी त्याला बाद दिले नव्हते, पण यानंतर त्याला तंबूत पाठवण्यासाठी जितेश शर्माने मयंक अगरवालला डीआरएस घेण्यास भाग पाडले आणि नंतर अल्ट्रा एजमध्ये दिसले की, चेंडू धोनीच्या बॅटला लागून जितेशच्या हातामध्ये गेला होता. त्यामुळे धोनीला तंबू गाठावा लागला.
https://twitter.com/Rahulc7official/status/1510674064276623360
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
या सामन्यात सीएसकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाबने लियाम लिव्हिंगस्टोनच्या ६० आणि धवनच्या ३३ धावांच्या मदतीने २० षटकात ८ विकेट्स गमावत १८० धावांचे आव्हान सीएसकेसमोर ठेवले. जितेश शर्माने सुद्धा १७ चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने २६ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट १५२ पेक्षा अधिक होता. चेन्नई संघ १७ षटकांत १२६ धावा करत सर्वबाद झाला. संघात शिवम दुबेने ३ षटकारांच्या आणि ६ चौकारांच्या मदतीने ३० चेंडूत सर्वाधिक ५७ धावा केल्या.
जितेशने यष्टीरक्षक म्हणून देखील उत्तम कामगिरी केली. त्याने अंबाती रायुडू आणि एमएस धोनी यांना तंबूत पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हा युवा यष्टीरक्षक गेल्यावर्षी फलंदाज मुंबई इंडियन्सचा भाग होता. तो विदर्भातील असून त्याने ५५ टी२० सामन्यांमध्ये २८.२२ च्या सरासरीने १३५५ धावा केल्या आहेत, यामध्ये ८ अर्धशतक आणि एका शतकाचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीने तब्बल १२ वर्षे पंजाबविरुद्ध न केलेला तो नकोसा विक्रम जडेजाने तिसऱ्याच सामन्यात केला
ऋतुराजच्या ३ सामन्यांत केवळ २ धावा; कर्णधार जडेजा म्हणतोय, ‘आम्हाला सर्वांना माहीत आहे की…’
IPL 2022| केव्हा आणि कसा पाहाल हैदराबाद वि. लखनऊ सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही