आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मानहानीकारक पराभव स्वीकारल्यानंतर विराटच्या संघाला जोरदार पुनरागमन करून विजयी मार्गावर परत यायचे आहे. दुसरीकडे, धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज विजयाची मालिका कायम ठेऊन, गुणतालिकेत अव्वलस्थानी राहू इच्छित असेल. अशा स्थितीत, शुक्रवारी होणाऱ्या आयपीएलचा ३५ वा सामना अत्यंत रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
हा सामना कधी? कुठे? होईल याबाबत जाणून घेण्यासाठी आणि सामन्याच्या प्रसारण आणि ऑनलाईन टेलीकॉस्ट बाबत जाणून घेण्यासाठी खालील विशेष माहिती क्रिकेट चाहत्यांसाठी.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु सामना कधी खेळला जाईल?
आयपीएल २०२१ चा ३५ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज शुक्रवारी म्हणजेच २४ सप्टेंबर रोजी खेळला जाईल.
चेन्नई आणि बंगळूर यांच्यात लढत कुठे होईल?
शारजाह क्रिकेट स्टेडियमवर हा सामना प्रथमच खेळला जाणार आहे.
सामना किती वाजता सुरू होईल?
नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता होईल आणि सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.
आपण थेट प्रक्षेपण कुठे पाहू शकतो?
चेन्नई आणि बंगळूरुमधील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर आठ वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल. हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त, सहा प्रादेशिक भाषांमध्ये देखील हे सामने पाहिले जाऊ शकतात.
ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहायचे?
डिझनी+हॉटस्टारवर सबस्क्रिप्शनसह सामना ऑनलाईन लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, केएस भरत (यष्टीरक्षक), एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, टीम डेविड/सचिन बेबी, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज आणि काइल जेमीसन/नवदीप सैनी.
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, एमएस धोनी (कर्णधार), अंबाती रायुडू, सॅम करन, ड्वेन ब्रावो, दीपक चहर, शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजा
महत्त्वाच्या बातम्या-
हे ‘स्लो ओव्हर रेट’ म्हणजे काय रे भावड्या? भल्याभल्या संघनायकांनाही याच्या भितीने फुटतोय घाम
सीएसकेविरुद्ध कोहली ‘हे’ अस्त्र काढणार बाहेर! गोलंदाजी करतो तब्बल १५४ किमी ताशी वेगाने
जगात भारी बापलेकाची जोडी! सचिनने मुलासोबतचा समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर फोटो केला शेअर