---Advertisement---

CSK विरुद्ध RCB: चेन्नईवर कोहलीची तुफानी तोफ धडाडणार?

On: शुक्रवार, मार्च 28, 2025 5:34 PM
---Advertisement---

विराट कोहलीची आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये चांगली सुरुवात झालेली आहे. त्याने हंगामाच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे आरसीबी संघ सामना जिंकू शकला. आता आरसीबी संघाचा सामना चेन्नई विरुद्ध आज म्हणजेच शुक्रवार 28 मार्च रोजी चेपॉकच्या मैदानावर खेळला जाणार आहे. त्याच्या चेंडूने चेन्नई विरुद्ध सामन्याआधी गोलंदाजांना चेतावणी दिलेली आहे.

विराटने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सामन्याआधी सरावादरम्यान खूप मेहनत केली आहे. त्याने नेट्स मध्ये वेगवेगळे शॉट खेळले आहेत. तिथे विराट शानदार फलंदाजी करताना दिसला. आजच्या सामन्यात विराट चेन्नईच्या गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. जर आज विराट कोहली चांगला खेळला तर आरसीबीच्या विजयासाठी ते सोपे ठरू शकते, तसेच विराट सोबत आरसीबीसाठी फिल साल्ट सुद्धा महत्त्वाची भूमिका करू शकतो. त्यानेही मागच्या सामन्यात अर्धशतक केले होते.

विराटने या हंगामाच्या पहिल्या सामन्यात केकेआर विरुद्ध 36 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या होत्या, त्यामध्ये त्याने 4 चौकार आणि 3 षटकार झळकावले होते. सगळ्या रेकॉर्ड बद्दल बोलायचे झाल्यास, कोहलीने 253 सामन्यात 8063 धावा केलेल्या आहेत. त्यामध्ये 8 शतकांचा आणि 56 अर्धशतकांचा समावेश आहे, त्याची सर्वश्रेष्ठ खेळी 113 धावांची आहे.

आताच्या हंगामातील आत्तापर्यंत पॉईंट्स टेबल पाहायचा झाल्यास,आरसीबी संघ टॉपच्या स्थानी आहे. त्यांनी एक सामना खेळलेला आहे व तो जिंकला आहे. तसेच लखनऊ संघ दुसऱ्या स्थानी आहे. त्यांनी दोन सामने खेळून एक सामना जिंकलेला आहे. पंजाब किंग्स तिसऱ्या स्थानावर आहे, तसेच चेन्नई सुपर किंग्स संघाबद्दल बोलायचे झाल्यास हा संघ चौथ्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स पाचव्या स्थानी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---