आयपीएल 2025 स्पर्धेतील 43 वा सामना आज म्हणजेच 25 एप्रिल रोजी एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील सनरायझर्स हैदराबाद दोन्ही संघांमध्ये सामना खेळला जाणार आहे. हा सामना चेपॉकच्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तसेच दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जो संघ आज पराभूत होईल तो संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही. जाणून घ्या या मैदानातील आयपीएल रेकॉर्ड आणि आज खेळपट्टी कशाप्रकारे असू शकते.
दोन्ही संघांच्या प्रदर्शनावर नजर टाकल्यास, या हंगामात दोन्ही संघांनी अतिशय खराब पद्धतीने प्रदर्शन केले आहे. हैदराबाद पॉईंट्स टेबलवर नवव्या स्थानावर तसेच चेन्नई दहाव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 8-8 सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये 6-6 सामन्यात पराभव पत्करला आहे. दोन्ही संघांसाठी प्लेऑफमध्ये पोहोचणे अत्यंत कठीण आहे आणि आज जो संघ पराभूत होईल तो प्लेऑफच्या रेस मधून बाहेर होईल.
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 21 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये 15 वेळा चेन्नई तसेच 6 वेळा हैदराबादने विजय मिळवला आहे. हैदराबाद विरुद्ध चेन्नईची सर्वात मोठी धावसंख्या 223 आहे आणि चेन्नई विरुद्ध हैदराबादची सर्वात मोठी धावसंख्या 192 धावा आहे.
चेपॉकची खेळपट्टी फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांसाठी फायदेशीर मानली जाते. ही खेळपट्टी फिरकीपटूंना अधिक जास्त मदत करते, पण या हंगामात परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली आहे. पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक मदत मिळाली आहे. फलंदाज या खेळपट्टीवर सहजपणे धावा करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हे एक मोठे आव्हान ठरले आहे. तसेच टॉस जिंकणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल.
चेपॉक स्टेडियमवर आतापर्यंत आयपीएलचे 89 सामने खेळले गेले आहेत. त्याचबरोबर येथे प्रथम फलंदाजी करणारा संघ 51 वेळा तसेच प्रथम गोलंदाजी करणारा संघ येथे 38 वेळा विजयी झाला आहे. टॉस जिंकणारा संघ 45 वेळा तर टॉस हारणारा संघ 44 वेळा जिंकला आहे.
हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास, पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नाही. तापमान 33 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
चेन्नई सुपर किंग्स: शेख रशीद, रचिन रवींद्र, आयुष म्हात्रे, रवींद्र जड़ेजा, शिवम दुबे, विजय शंकर, जेमी ओवरटन, एमएस धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पथिराना, आर अश्विन.
सनराइजर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, पैट कमिंस (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनादकट, जीशान अंसारी, ईशान मलिंगा, राहुल चाहर.