इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील २२वा सामना मंगळवारी (दि. १२ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. हा सामना डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी, मुंबई येथे पार पडला. हा सामना चेन्नईने २३ धावांनी जिंकला. यासह चेन्नईने हंगामातील पहिला सामना आपल्या नावावर केला. यापूर्वी खेळलेल्या ४ सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. चेन्नईच्या विजयाचे शिल्पकार शिवम दुबे, रॉबिन उथप्पा आणि महीश तीक्षणा ठरले. दुबे सामनावीराचा मानकरी ठरला.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने (Faf Du Plessis) नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तसेच, चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिले. यावेळी चेन्नईने निर्धारित २० षटकात ४ विकेट्स २१६ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १९० धावाच करता आल्या.
First win ku #WhistlePodu 🥳💛#CSKvRCB #Yellove 🦁 pic.twitter.com/VJtaA92h22
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 12, 2022
बेंगलोरकडून फलंदाजी करताना शाहबाज अहमदने (Shahbaz Ahmed) सर्वाधिक धावा केल्या. त्याने २७ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त दिनेश कार्तिक आणि सुयश प्रभूदेसाई यांनी प्रत्येकी ३४ धावा केल्या. तसेच, ग्लेन मॅक्सवेलने २६ धावांचे योगदान दिले. या खेळाडूंव्यतिरिक्त इतर कोणालाही २० धावाही पूर्ण करता आल्या नाहीत. कर्णधार फाफ डू प्लेसिसने तर फक्त ८ धावाच केल्या होत्या.
यावेळी चेन्नईकडून गोलंदाजी करताना महीश तीक्षणाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३३ धावा देत ४ विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, कर्णधार रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मुकेश चौधरी आणि ड्वेन ब्रावो यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून शिवम दुबेने अफलातून फलंदाजी करत सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४६ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ९५ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त रॉबिन उथप्पानेही शानदार फलंदाजी केली. त्याने ५० चेंडूंचा सामना करताना ८८ धावा केल्या. यामध्ये ४ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. तसेच, ऋतुराज गायकवाडने १७ धावांचे योगदान दिले. मोईन अली ३ धावांवर बाद झाला, तर रवींद्र जडेजाला यावेळी शून्य धावेवर समाधान मानावे लागले. एमएस धोनी शून्य धावेवर नाबाद राहिला.
यावेळी बेंगलोरकडून गोलंदाजी करताना वनिंदू हसरंगाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. यावेळी त्याने ३ षटके गोलंदाजी करताना ३५ धावा देत २ विकेट्स चटकावल्या. तसेच, बेंगलोरकडून पदार्पण करणारा जोश हेजलवूडने १ विकेट खिशात घातली.
या विजयासह चेन्नई संघाने गुणतालिकेत १०व्या क्रमांकावरून ९व्या क्रमांकावर उडी घेतली आहे. तसेच, बेंगलोर संघाची पाचव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
हरभजनचा ‘माही’वर घणाघात; “एकट्या धोनीने वर्ल्डकप जिंकवला, मग बाकीचे काय …. प्यायला गेले होते का”
टीम बॅन झाली नसती तर आज यादीत टॉपला असती; IPL संघ म्हणून सीएसकेने नोंदवला खास विक्रम
‘धोनी ओपनिंग करून संघाला संकटातून काढू शकतो बाहेर’, माजी यष्टीरक्षक फलंदाजाचे मोठे विधान