रविवारी (४ सप्टेंबर) दुबईत झालेला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघातील आयपीएल सामना रोमांचक ठरला. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ बाद १७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईच्या केवळ २ धुरंधरांनी १७.४ षटकात पंजाबचे आव्हान पूर्ण केले आणि १० विकेट्सनी सामना जिंकला. हा चेन्नईचा या हंगामातील दूसरा विजय होता.
पंजाबने दिलेले १७९ धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी चेन्नईचे फलंदाज शेन वॉटसन आणि फाफ डू प्लेसिस सलामीला फलंदाजीसाठी आले. डू प्लेसिसने शेवटपर्यंत फलंदाजी करत ५३ चेंडूत सर्वाधिक नाबाद ८७ धावा केल्या. यात त्याच्या ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तर वॉटसननेही नाबाद राहत ५३ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकरांच्या मदतीने ८३ धावा ठोकल्या.
या दोन्ही फलंदाजांच्या चौफेर फटकेबाजीपुढे पंजाबचे गोलंदाज कोणतीही कमाल दाखवू शकले नाहीत.
तत्पुर्वी प्रथम फलंदाजी केलेल्या पंजाब संघाकडून कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक धावा केल्या. ५२ चेंडूत ७ चौकार आणि एक षटकार मारत त्याने ६३ धावा ठोकल्या. त्याच्याव्यतिरिक्त निकोलस पूरनने १७ चेंडूत ३३ धावांची तूफानी खेळी केली. तर मनदिप सिंग आणि मयंक अगरवालनेही अनुक्रमे २७ धावा आणि २६ धावांचे योगदान दिले होते.
चेन्नईकडून गोलंदाजी करताना शार्दुल ठाकूरने महत्त्वपूर्ण अशा २ विकेट्स घेतल्या होत्या. यात राहुल आणि निकोलस यांच्या विकेटचा समावेश होता. तर जडेजा आणि चावलानेही प्रत्येकी १-१ फलंदाजाला बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
व्वा रे माही! यष्टीमागेही ठरला किंग, पूर्ण केली कॅचची ‘सेंच्यूरी’
मुंबईच्या धडाकेबाज विजयानंतर सोशल मीडियावर अशा उमटल्या प्रतिक्रिया
हैदराबादला धूळ चारत मुंबईचा ३८ धावांनी विजय; घेतली अव्वल क्रमांकावर उडी
ट्रेंडिंग लेख-
विजयासाठी आसुसलेल्या चेन्नईला हरवायचंय.. पंजाबला करावे लागतील ३ महत्वाचे बदल….
बेंगलोरने राजस्थानविरुद्धचा सामना एकहाती जिंकला; पाहा राजस्थानच्या पराभवाची ३ प्रमुख कारणे
आयपीएलमध्ये १५० बळींचा टप्पा गाठणारे गोलंदाज, चारपैकी तीनही भारतीय फिरकीपटू