पुणे। आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द मुंबई इंडियन्स लढत रंगणार आहे. हा सामना चेन्नई संघाचे नवे घरचे मैदान असलेल्या पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे.
या दोन्ही संघाचा हा आयपीएलमधील 7वा सामना असणार आहे. 6 पैकी 5 सामने जिंकून चेन्नई गुणतालिकेत अव्वल स्थानी तर मुंबई 1 सामना जिंकून तळाला आहे.
या मोसमाच्या सुरूवातीस झालेल्या सामन्यात चेन्नईने अखेरच्या क्षणी मुंबईवर १ विकेटने मात केली होती. या सामन्यात मुंबईने चेन्नईला विजयासाठी २० षटकात १६६ धावांचे आव्हान दिले होते.
चेन्नईची अवस्था १६.३ षटकात ८ बाद ११८ धावा अशी असताना यानंतर अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने इम्रान ताहिरला साथीला घेऊन ३० चेंडूंतच ६८ धावा केल्या. यात त्याने ७ षटकार आणि ३ चौकार ठोकले. त्याच्या या खेळीमुळे चेन्नईला अशक्य वाटणारा विजय शक्य झाला.
चेन्नईने 2 वर्षाच्या बंदीनंतर चांगलेच पुनरागमण केले आहे. हा संघ सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे.
त्यांच्याकडे कर्णधार एम एस धोनी, सुरेश रैना आणि अंबाती रायडू अशी फलंदाजांची मजबूत फळी तर गोलंदाजीत शार्दूल ठाकूर,रवींद्र जडेजा आणि हरभजन सिंग आहेत. तसेच ड्वेन ब्रावो, शेन वॉटसन सारखे अष्टपैलू खेळाडू आहेत.
मुंबईची फलंदाजी पण उत्कृष्ठ आहे. त्यांच्याकडून कर्णधार रोहित शर्मा,एविन लेवीस, सुर्यकुमार यादव आणि अष्टपैलू कृणाल पांड्या, किरोन पोलार्ड हे फलंदाजीसाठी पर्याय आहेत.
मंयक मरकंडे (6 सामन्यात 10 विकेट्स) हा मुबंईकडून जास्त विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला आहे. तर त्याच्या साथीला मिशेल मॅकलॅंघन (4 सामन्यात 6 विकेट्स), जसप्रीत बुमराह (6 सामन्यात 8 विकेट्स) हे आहेत.
चेन्नईने सलग तीन सामने जिंकले आहे तर मुंबईला विजयाची आशा आहे.
कधी होईल आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द मुंबई इंडियन्स सामना ?
चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द मुंबई इंडियन्स या संघांमध्ये आयपीएल 2018 चा 27 वा सामना आज, 28 एप्रिलला होणार आहे.
कुठे होईल आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना?
चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द मुंबई इंडियन्स यांच्यातील आजचा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन इंटरनॅशनल स्टेडियम, पुणे येथे होईल.
किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द मुंबई इंडियन्स सामना?
आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द मुंबई इंडियन्स सामना आज रात्री ८.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक रात्री ७.३० वाजता होईल.
कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द मुंबई इंडियन्स सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द मुंबई इंडियन्स सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.
आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द मुंबई इंडियन्स सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द मुंबई इंडियन्स सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.
यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:
चेन्नई सुपर किंग्ज: एम एस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग, फाफ डू प्लेसिस, ड्वेन ब्रावो, केदार जाधव,शेन वॉटसन, अंबाती रायडू, इम्रान ताहीर, कर्ण शर्मा,एन जगदीसन, मुरली विजय, सॅम बिलिंग्स, शार्दूल ठाकूर, लुंगी एन्गिडी, मोनू सिंग कुमार, केएम असिफ, मार्क वूड, दीपक चाहर, कनिष्क सेठ, ध्रुव शोरे, क्षितिज शर्मा, चैतन्य बिष्णोई
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार ), जसप्रीत बुमराह, सुर्यकुमार यादव, ईशान किशन , एविन लेवीस, मंयक मरकंडे, मिशेल मॅकलॅंघन, मुस्तफिजूर रहमान, हार्दीक पांड्या, कृणाल पांड्या, किरोन पोलार्ड, राहुल चहर, बेन कटिंग, अखिला धंनजया, जे पी ड्युमिनी, सिध्देश लाड, शरद लुंबा, अडम मिलने, मोहसीन खान, एम डी निधीष, अनुकूल रॉय, प्रदिप संघवान,ताजिंदर सिंह, आदित्य तारे, सौरभ तिवारी
महत्त्वाच्या बातम्या –
–Video: पहा सचिन तेंडूलकर, एमएस धोनीपोठीपाठ मुंबईकर पृथ्वी शॉचा हेलिकॉप्टर शॉट!
–कॅप्टन म्हणून खेळला पहिलाच सामना, परंतू विक्रमांचा केला महा धमाका
–भारत पाकिस्तान सामन्यासाठी असे आहेत तिकीटांचे दर
–पहा व्हिडीओ- सिक्सर किंग जेव्हा आजमावतो स्टंपमागे नशीब
–आयपीएल होणारच, पण भारतात नाही तर या देशात!
–आयपीएलमध्ये पहिल्यांदाच जुळून आला असा योगायोग