भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराग हा गेल्या काही वर्षात सध्याच्या काळातील एक उत्तम गोलंदाज म्हणून नाव कमावले आहे. त्याच्या गोलंदाजीपुढे भल्या-भल्या दिग्गज फलंदाजांची त्रेधातिरपीट उडते. अनेक दिग्गज त्याच्या गोलंदाजीचे चाहते आहेत. यात वेस्ट इंडिजचे दिग्गज वेगवान गोलंदाज कर्टली अँब्रोस यांचाही समावेश आहे. त्यांनी नुकतेच त्याचे कौतुक केले आहे.
अँब्रोस यांनी म्हटले आहे की बुमराहकडे कसोटीत ४०० विकेट्स घेण्याची क्षमता आहे. त्यांनी ‘कर्टली अँड करिष्मा’ या यु-ट्यूब चॅनेलच्या एका चॅट शोमध्ये म्हटले की ‘भारताकडे काही चांगले वेगवान गोलंदाज आहेत. मी जसप्रीत बुमराहचा मोठा चाहता आहे. मी जेवढे गोलंदाज पाहिले आहेत, त्यात बुमराह सर्वात वेगळा आहे. तो खुप प्रभावशाली गोलंदाज आहे. मला वाटते की त्याने भविष्यात आणखी चांगली कामगिरी करावी.’
तसेच जेव्हा अँब्रोस यांना विचारण्यात आले की बुमराह कसोटीत ४०० विकेट्स घेऊ शकतो का? त्यावर अँब्रोस म्हणाले, ‘तो जोपर्यंत तंदुरुस्त आहे आणि पुढे बराच काळ खेळत राहिल. तो सीमबरोबरच चेंडू स्विंग करु शकतो. याशिवाय तो चांगला यॉर्करही टाकू शकतो. त्याच्या गोलंदाजीत अनेक विविधता आहे. जर तो अधिक काळ खेळला तर मला आशा आहे की तो सहज ४०० कसोटी विकेट्स घेऊ शकतो.’
तसेच ४०५ कसोटी विकेट्स घेतलेले अँब्रोस पुढे म्हटले जरी बुमराहचा रनअप छोटा असला आणि तो त्याच्या शरिरावर अधिक दबाव टाकत असला, तरी तो जर स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यात यशस्वी झाला तर त्याची कारकिर्द मोठी होईल. तसेच अँब्रोस यांनी असेही म्हटले की लय ही वेगवान गोलंदाजासाठी महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे चेंडू फेकण्याआधी वेगवान गोलंदाज चांगल्या लयीत असणे गरजेचे असते. बुमराह जर त्याच्या शरिराला मजबूत ठेवू शकला तर तो त्याला कसोटी क्रिकेटमध्ये लांबचा पल्ला गाठण्यास त्रास होणार नाही.
बुमराहची कसोटी कारकिर्द
बुमराहने त्याच्या कसोटी कारकिर्दीत आत्तापर्यंत १९ कसोटी सामने खेळले असून २२.१० च्या सरासरीने त्याने ८३ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने ५ वेळा एका डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –