भारतीय संघाने वनडे विश्वचषक 2023 मधील आपला शेवटचा ग्रुप स्टेज सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळला. रविवारी बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने 160 धावांनी विजय मिळवला. भारताला आपला पुढचा सामना उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. तत्पूर्वी नेदरलँड्सला धूळ चारल्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंनी चाहत्यांची एका खास कारणास्तव मने जिंकली.
एम चिन्नास्वामी स्टेडियम फलंदाजी करणाऱ्या संघासाठी नेहमीच अनुकूल राहिले आहे. भारताने देखील नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट्सच्या नुकसानावर 410 धावांची मोठी खेळी केली. प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा डाव 250 धावांवर गुंडाळला गेला. श्रेयस अय्यर सामनावीर ठरला, ज्याने 128* धावांची उच्चांकी खेळी केली होती. त्याचसोबत केएल राहुल यानेही 102 धावांचे योगदान संघासाठी दिले होते. गोलंदाजी विभागत भारतासाठी एकूण 9 खेळाडूंनी गोलंदाजी केली. यात विराट कोहली (Virat Kohli), आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी प्रत्येकी एक एक विकेट देखील नावावर केली. सूर्यकुमार यादनवने गोलंदाजीत हात आजमावला पण त्याला यश मिळाले नाही.
नेदरलँड्सला मोठ्या अंतराने पराभूत केल्यानंतर विराट कोहली याने आपली जर्सी भेट म्हणून दिली. डावखुरा फिरकीपटू रुलॉफ वॅन डर मर्व याने ही जर्सी भेट म्हणून मिळाली. तसेच मोहम्मद शमी नेदरलँड्सच्या गोलंदाजांना काही महत्वाचे सल्ले देताना दिसला. भविष्यात या सल्लांचा फायदा नेदरलँड्स संघाच्या गोलंदाजांना मिळू शकतो.
https://www.instagram.com/reel/CzkVN_zv9DV/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतासह, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या चार संघांनी स्थान पक्के केले आहे. यात भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना बुधवारी (15 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. गुरुवारी (16 नोव्हेंबर) दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघ आमने सामने असणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अमहदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे.
महत्वाच्या बातम्या –
मायदेशी परतताच पाकिस्तान संघाला जोरदार धक्का! वर्ल्डकपमधील सुमार कामगिरीनंतर आला पहिला राजीनामा
गुरबाजने केलेली अहमदाबादच्या गरीब लोकांची मदत; पाहून शशी थरूरही म्हणाले, ‘हृदयासारखं तुझं करिअरही…’