गोल्ड कोस्ट | आॅस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या 21व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बाॅक्सरनी आजचा दिवस गाजवला आहे. बाॅक्सर अमित पंघालने आज 46-49 वजनी गटात भारताला रौप्यपदक मिळवुन दिले.
अमित पंघाल हा सलग तिसऱ्यांदा आंतराष्ट्रीय सुवर्णपदकासाठी खेळत होता; पण यावेळेस त्याला भारताला सुवर्णपदक मिळवुन देण्यास अपयश आले. अंतिम सामन्यात इंग्लडच्या गलाल याफाईने 3-1 ने अमित पंघालचा पराभव केला. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
अमित पंघालने सामन्यावर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला; पण गलाल याफाईच्या आक्रमतेसमोर तो टिकू शकला नाही. पाच पंचापैकी एका पंचानी दोघाना समान गुण दिले. त्यामुळे शेवटी निर्णय 3-1 असा झाला.
त्याआधी सकाळी बाॅक्सिंगमध्ये मेरी कोमने 45-48 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर गौरव सोलंकीने पुरुषांच्या 52 किलो वजनी गटात सुवर्णपदक, मनीष कौशीकने 60 किलो वजनी गटात रौप्यपदक, विकास कृष्णनने ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक आणि सतीश कुमारने ९१ किलो वजनी गटात रौप्यपदक जिकंत आजचा दिवस गाजवला.
Boxer #AmitPanghal picked up another medal for #TeamIndia earlier today, a Silver 🥈 when he met #YafaiGalal of #TeamEngland in #GC2018Boxing Men's 46-49kg Final Bout at #GC2018 #CommonwealthGames
Yafai was unanimously declared the Gold winner beating Amit 3-1.#WellDone Amit! 👏 pic.twitter.com/QHQY5hz06Y— Team India (@WeAreTeamIndia) April 14, 2018