गोल्ड कोस्ट | राष्ट्रकुल २०१८ स्पर्धेत भारताने रौप्य पदकापाठोपाठ सुवर्ण पदकालाही गवसणी घातली आहे. वेटलिफ्टर मिराबाई चानूने भारताला हे सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.
४८ किलो वजनी गटात १९६ किलो वजन उचलत तिने राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रम केला आहे. यापुर्वी या वजनी गटात अशी कामगिरी कुणालाही करता आली नाही.
तिने ६ वेळा वजन उचलताना ६ राष्ट्रकुल विक्रम प्रस्थापित केले. तीने स्नॅच(८६ किलो), क्लीन अँड जर्क (११० किलो) आणि एकूण (१९६ किलो) असे सगळे राष्ट्रकुल विक्रम लागोपाठ मोडले. तिची कामगिरी एवढी जबरदस्त होती की तीने दुसऱ्या क्रमांकावरील स्पर्धकाला तब्बल २६ किलोने मागे टाकले.
यापुर्वी राष्ट्रकुल स्पर्धेतील हा विक्रम अॅंटीगाच्या अाॅगुस्टा न्वाकोलाच्या नावावर होता. तिने ४८ किलो वजनी गटात दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत हा विक्रम केला होता.
#Commonwealth2018 #GC2018 #Congratulations #MirabaiChanu for India's first gold 🥇 medal at cwg 2018 🇮🇳 pic.twitter.com/dXr3CaNyTw
— Doordarshan Sports (@ddsportschannel) April 5, 2018