बर्मिंघम येथे सुरू असलेल्या २२व्या कॉमनवेल्थ गेम्सच्या (Commonwealth Games) हंगामात भारतीय हॉकी संघाची निराशा झाली . भारतीय महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून (INDvsAUS) शूटआउटमध्ये ३-० असा पराभूत झाला. यामुळे भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. तर भारत आता कांस्य पदकाच्या सामन्यात खेळणार आहे. सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली, ज्यामुळे सामना भारतीय संघाच्या हातून निसटला. आता या घटनेवरून आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) भारतीय संघाची क्षमा मागितली आहे.
गोलकिपर सविताची उत्तम कामगिरी आणि पेनाल्टी शूटआउट
या सामन्यात भारताची गोलकिपर सविताने उत्तम प्रदर्शन केले. तिने विरोधी संघाचे अनेक गोल रोखले. यामुळे सामन्याची पूर्णवेळ झाल्याने दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत होते. त्यामुळे पेनाल्टी शूटआउटमध्ये सामन्याचा निकाल ठरणार होता. शूटआउट सुरू झाली असता पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाने सुरूवात केली. तो गोल रोखण्यास भारताच्या गोलकिपरला यशही आले. मात्र नंतर समजले की वेळच (टाईमआऊट) सुरू झाली नव्हती. यामुळे ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा संधी मिळाली आणि त्यांनी शूटआउटमध्ये भारताला ३-० असे पराभूत केले.
एफआयएचने मागितली क्षमा
या घटनेवरून सोशल मीडियावर विवाद सुरू आहे. अनेकांनी एफआयएचच्या या चुकीवरून त्यांचे कान टोचले आहेत. यानंतर आता आता एफआयएचने या प्रकरणी क्षमा मागितली असून या संपूर्ण घटनेची समीक्षा केली जाईल, असे आश्वासनही दिले आहे.
The process in place for such situations is that the penalty shootout has to be retaken, which was done. This incident will be thoroughly reviewed by the FIH in order to avoid any similar issues in the future. (2/2)
— International Hockey Federation (@FIH_Hockey) August 6, 2022
एफआयएचने क्षमा मागताना म्हटले की, “बर्मिंघम राष्ट्रकुल खेळात ऑस्ट्रेलिया आणि भारत महिला संघांदरम्यान झालेल्या उपांत्य सामन्यादरम्यान शूटआऊट चुकून खूपच लवकर सुरू झाले होते. यावेळी घड्याळ चालूच झाले नव्हते. ज्यासाठी आम्ही क्षमा मागतो. अशा परिस्थितीत पुन्हा पेनल्टी शूटआऊट घेण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा पेनल्टी शूटआऊट घेतला. एफआयएच या संपूर्ण घटनेचा पूर्णपणे तपास घेईल. जेणेकरून भविष्यात अशा समस्यांपासून वाचता येईल.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ खेळाडूवर रोहित-द्रविडचा अन्याय! टी२० विश्वचषकासाठी दावा ठोकण्याची देत नाहीयेत एकही संधी
BCCI vs Nita Ambani | बीसीसीआयकडून मुंबई इंडियन्सच्या मालकिणीला नोटीस, मागितले लेखी उत्तर