कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games)भारताने पाकिस्तानला ८ विकेट्सने पराभव केला. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना ९९ धावाच केल्या. हे लक्ष्य भारताने ११.४ षटकातच गाठले. या विजयात भारताची सलामीवीर स्म्रीती मंधानाने जबरदस्त कामगिरी केली. तिने १५०च्या स्ट्राईक रेटने खेळताना ८ चौकार आणि ३ षटकार फटकारले. हा सामना भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरसाठीही विशेष राहिला.
पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकताच हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ही भाराताची महिला आणि पुरूषमध्ये सर्वाधिक टी२० सामने जिंकणारी कर्णधार ठरली. हा पराक्रम करताच तिने एमएस धोनी (MS Dhoni) याला मागे टाकले आहे. धोनीच्या नेतृत्वामध्ये भारताने ७१ पैकी ४२ सामने जिंकले.
या विक्रमी विजयानंतर हरमनप्रीतने हृद्य जिंकणारे एक कामही केले. तिने पाकिस्तानी क्रिकेटपटूला आपली बॅट भेट म्हणून दिली. तर भारताच्या या स्टार खेळाडूची बॅट भेटवस्तू म्हणून मिळाल्याने त्या पाकिस्तानी खेळाडूचा आनंद गगनात मावेनासा झाला. तर दोन्ही संघांनी हरमनप्रीतचे कौतुकही केले. तसेच भारतीय क्रिकेट चाहतेही तिच्या या विशिष्ट अंदाजाचे दिवाने झाले.
https://twitter.com/Mahesh13657481/status/1553735527467077633?s=20&t=vT2Yc5UtOgc4iwBv6719mg
भारताच्या खेळाडूंनी याआधीही केले आहे हृद्य जिंकणारे काम
भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी हृद्य जिंकणारे काम करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यावर्षीच्या मार्च महिन्यात विश्वचषक झाला तेव्हा भारत-पाकिस्तान समोरासमोर आले. तेव्हा पाकिस्तान कर्णधार बिस्माह मारूफच्या मुलीसोबत भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू खेळताना दिसले होते. त्याचे काही फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. तेव्हा पण दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांनी भारतीय संघाचे कौतुक केले होते.
त्याचबरोबर भारताच्या पुरूष संघातील विराट कोहलीने पाकिस्तानच्या मोहम्मद आमीरला तर हार्दिक पंड्याने आयर्लंडच्या हॅरी टेक्टरला त्यांच्या बॅट भेट म्हणून दिल्या होत्या.
भारताची सेमीफायनलची रेस
पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानंतर भारताचे कॉमनवेल्थ गेम्सच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारताचा पुढील सामना बार्बादोसशी होणार आहे. हा सामना ३ ऑगस्टला खेळला जाईल. हा सामना बाद फेरीसारखा असणार आहे. कारण दोन्ही संघांनी २ सामने खेळत एक-एक सामने गमावले आहे. तर भारताचा नेट रनरेट उत्तम आहे. मात्र त्यांना उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी बार्बाडोस विरुद्ध विजय आवश्यक आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटमधील दुषित वातावरणाचे कारण देत विंडीजच्या आणखी एका दिग्गजाने जाहिर केली निवृत्ती!
हुश्श! भारतीय संघ आता सेमिफायनलमध्ये पोहचणार, फक्त करावे लागेल ‘हे’ सोपे काम
मोईनला बाद करण्यासाठी स्टब्सचा अफलातून झेल, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल