शनिवारी (०६ ऑगस्ट) कॉमनवेल्थ गेम्स २०२२ चे उपांत्य फेरी सामने खेळले गेले. पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला ४ धावांनी पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ५ विकेट्सने मात करत अंतिम सामन्यात जागा बनवली आहे. अशाप्रकारे आता रविवारी (०७ ऑगस्ट) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात अंतिम सामना रंगेल. हा सामना जिंकणारा संघ सुवर्णपदक मिळवेल, तर पराभूत संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागेल.
मात्र भारतीय संघासाठी (Indian Women Cricket Team) कॉमनवेल्थचा अंतिम सामना (CWG 2022 Final) जिंकणे सोपे असणार नाही. कारण भारतीय संघाने आतापर्यंत बऱ्याच जागतिक स्पर्धांमध्ये चांगले प्रदर्शन करत बादफेरीपर्यंतचा प्रवास केला आहे. परंतु त्याला विजेतेपद जिंकण्यात यश आलेले नाही. तसेच ऑस्ट्रेलिया संघानेही (AUS vs IND) भारताला मोठ्या स्पर्धेत काही जखमा दिल्या आहेत.
वर्ष २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभूत करत त्यांच्या स्वप्नाचा चुराडा केला होता. २ वर्षांपूर्वीची ही जखम भारतीय संघ अजूनही विसरला नसेल. याखेरीज कॉमनवेल्थच्या पहिल्या सामन्यात चांगली सुरुवात करूनही भारताला ऑस्ट्रेलियाला पराभूत करता आले नव्हते.
ऑस्ट्रेलियाने भारताला २ वर्षांपूर्वी दिलेली जखम
मार्च २०२० मध्ये मेलबर्नच्या मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात टी२० विश्वचषक २०२०चा (T20 World Cup 2020) अंतिम सामना खेळला गेला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १८४ धावांचा विशाल स्कोर उभा केला होता. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर एलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी मोठ्या खेळी केल्या होत्या. हिलीने ३९ चेंडूत ७५ धावा केल्या होत्या. तर मूनीने ५४ चेंडूत ७८ धावांचे योगदान दिले होते.
प्रत्युत्तरात भारताच्या फलंदाज पूर्णपणे फेल ठरल्या होत्या. भारताकडून दिप्ती शर्मा सर्वाधिक ३३ धावा करू शकली होती. इतर फलंदाज २० धावांच्या आतच बाद झाल्या होत्या. परिणामी भारतीय संघ ९९ धावांवरच सर्वबाद झाला होता. या डावात ऑस्ट्रेलियाकडून मेघन शटने सर्वाधिक ४ विकेट्स काढल्या होत्या. तसेच जेस जोनासनने भारताच्या ३ फलंदाजांना बाद केले होते.
ऑस्ट्रेलिया नेहमीच भारतावर पडलीय भारी
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडे पाहायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियाचा संघ नेहमीच भारतावर भारी पडला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २४ टी२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारतीय संघाला फक्त ६ सामने जिंकला आले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने भारताच्या ३ पटीने अर्थात १७ सामन्यात विजय मिळवला आहे. उभय संघातील एका सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारत वि. ऑस्ट्रेलिया संघात रंगणार गोल्ड मेडलचा अंतिम सामना, जाणून घ्या मॅचबद्दल सर्वकाही
अजून किती छळशील..! आधीच त्रासलेल्या वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचा भर मैदानात पंतने मांडला छळ
यजमानांचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय; तब्बल तीन बदलांसह टीम इंडिया उतरली चौथ्या टी२० त;